आवाटी विविध कार्यकारी सेवा संस्थेचे चेअरमन श्री.उस्मान हानीफ खान यांचे निधन
करमाळा –

आवाटी विविध कार्यकारी सेवा संस्थेचे चेअरमन श्री.उस्मान हानीफ खान यांचे वया च्या 83 व्या वर्षी हृदयविकार च्या झटकयाने सोमाणी हास्पिटल, बार्शी येथे दि. 7/06/2026 रोजी उपचारा दरम्यान दु:खद निधन झाले आहे. ते आवाटी सोसायटी चे 1995 पासून आज पर्यंत 31 वर्ष चेअरमन होते.

संस्थें मार्फत 100 सभासदांना पाईप लाईन कर्ज, शेतघर कर्ज, 275 सभासदांना पिक कर्ज सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बॅके मार्फत मिळवून दिले. या साठी करमाळा तालुक्याचे नेते मा.आ.जयवंतराव जगताप साहेब यांचे सहकार्य लाभले. कै.नामदेवराव जगताप साहेब यांच्या पासून ते आज पर्यंत ते जगताप गटाचे खंदे समर्थक म्हणून कार्य करत होते.
त्यांचे पश्च्यात 10 भाऊ व त्याचे मुले, पत्नी व मुलगा राजू उस्मान खान व 8 मुली असा परिवार आहे. अंत्यविधी वेळी माजी नायब तहसीलदार अब्दुल माजित काझी, मकाईचे संचालक गोकुळ नलवाडे, सरपंच इम्रान जिगर खान, मार्केट कमिटीचे संचालक नसारुला खान माजी सरपंच दादासाहेब बंडगर उपसरपंच तन्वीर शेख, आदिनाध कारखाना चे संचालक आबासाहेब आंबारे गावातील लोक नातेवाईक उपस्थित होते.


