चव्हाण बंधुंच्या नव्या व्यवसायाचे आज उद्घाटन ; अनोख्या व्यवसायामुळे होतेय कौतुक
करमाळा –
सध्या शहराच्या प्रस्थ मोठ्या प्रमाणावर वाढत चालले आहे. शहर तसेच ग्रामीण मध्ये मोठी घरी पाहायला मिळत आहेत. करमाळ्यातील जमिनींचे भाव हे गगनाला भिडले आहेत. तरीही मोठ्या प्रमाणावर घरांचे स्वप्न पूर्ण केले जात आहे. यात स्वप्नांना दृष्टी देण्यासाठी करमाळ्यात नवा व्यवसाय सुरू होत आहे. ‘फर्स्ट ड्रीम’ इंटरियर अँड डेकोरेटर्स हा व्यवसाय चव्हाण ब्रदर्स घेऊन आले आहेत.

तालुक्यात चांगली घरी बांधण्यात येतात. पण त्यासाठी नेमका कशा पद्धतीने गृह सजावट करावी हे मात्र अनेकांना समजत नाही. पुणे मुंबई या ठिकाणी साधारण घरांना सुद्धा उत्कृष्ट पद्धतीने ग्रह सजावट केल्यानंतर ते कशा पद्धतीने आकर्षक बनते हे उत्तम उदाहरण पाहिले आहे. आता तीच सुविधा ग्रामीण भागातही उपलब्ध होत आहे.

चव्हाण बंधू यांनी करमाळ्यात नवा व्यवसाय सुरू केला आहे. या मध्ये ऑफिस किंवा कोणत्याही स्पेस साठी एक आणि आकर्षक फर्निचर, हार्डवेअर, मॅट्रिक्स व गृह सजावटीच्या वस्तू तर विक्रीसाठी ठेवण्यात आल्याच आहेत. शिवाय कशा पद्धतीने गृह सजावट करायची याची ही माहिती या व्यवसायातून मिळणार आहे. त्यामुळे अनेकांना स्वस्तात आणि उत्कृष्ट असे गृह सजावट मार्गदर्शन व सुविधा आता उपलब्ध होणार आहेत. त्यांनी या व्यवसायातून सुरुवात केली व करमाळा शहराला पसंती दिली यामुळे त्यांचं मित्रमंडळी व जवळच्या लोकांकडून कौतुकही होत आहे.
या व्यवसायाची सुरुवात शुक्रवार दिनांक १६ मे रोजी सकाळी साडेदहा वाजता करमाळा बायपास चौक देवीचा माळ रस्ता या ठिकाणी उद्घाटन केले जाणार आहे. यासाठी गितेश चव्हाण व दीपक चव्हाण यांनीआवर्जून निमंत्रित केले आहे.