छात्रभारतीच्या वतीने विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा
करमाळा

गेले 21 दिवस झालं दिल्ली येथे जंतर-मंतर या ठिकाणी अनेक विद्यार्थी नीट पेपर फुटी संदर्भात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनामा बाबत आंदोलन करत आहेत. त्या आंदोलनात महाराष्ट्रातून तसेच देशभरातून अनेक विद्यार्थी सहभागी झाले आहेत. यावेळी छात्रभारतीच्या वतीने दिल्ली येथे चालू असलेल्या आंदोलनाला जाहीर असा पाठिंबा दिला व सरकारचा जाहीर निषेध केला.

ज्या अमानुषपणे विद्यार्थ्यांना लाठीचार्ज व हुकूमशाही पद्धतीने त्यांचे आंदोलन दाबण्यात आले. या हुकूमशाहीचा व केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा जाहीर असा निषेध करण्यासाठी करमाळा शहरातील छात्रभारती विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी तसेच अनेक युवक विद्यार्थी यांनी तहसीलदार यांना पत्रक देऊन व लोकशाही जिंदाबाद, विद्यार्थी एकता जिंदाबाद ,अशा घोषणा दिल्या.
धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा न दिल्यास लोकशाही मार्गाने महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर यापेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू यावेळी विद्यार्थ्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले.

यावेळी छात्रभारतीचे राज्यसदस्य सौरव शिंपी, छात्र भारती पुणे जिल्हा सहसंघटक महेश पवार ,तालुका समन्वयक प्रथमेश जाधव, प्रसाद काळे, अमित थोरात, रतन सिंग, अशोक साडेकर, समर्थ सुरवसे, प्रज्वल गबाले, मयूर फंड ,आकाश वीर हे उपस्थित होते.

