करमाळा बार असोसिएशनकडून राष्ट्रपतींना निवेदन; दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा
करमाळा, दि. 23 जुलै :

आज पर्यंत वेगवेगळ्या आंदोलनाला चिरडत सरकार मनमानी पद्धतीने वागत आहे. अशा सरकारच्या माध्यमातून चुका करणाऱ्यांना पाठीशी घातले जात आहे. सरकारने धर्मेद्र प्रधान यांच्यावर जबाबदारी निश्चित करून राजीनामा घ्यावा तसे मुलींवर निर्दयीपणे तसेच चुकीच्या पद्धतीने मारहान करणाऱ्या पोलिसांवर पोकसो सारखे गुन्हे दाखल करून जखमीना नुकसान भरपाई देण्याची मागणी वकील संघाकडून करण्यात आली. याबाबतचे निवेदन तहसीलदार करमाळा यांच्या कडे देण्यात आले.

दिल्लीमध्ये NEET परीक्षेतील गैरव्यवहाराच्या निषेधार्थ सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला करमाळा तालुका बार असोसिएशनने पाठिंबा दर्शविला आहे. यावेळी ते जेष्ठ वकील बोलत होते. याबाबत राष्ट्रपतींना निवेदन पाठवून आंदोलनकर्त्यांवरील कथित पोलिस अत्याचाराचा निषेध करण्यात आला आहे.
बार असोसिएशनने दिलेल्या निवेदनात आंदोलनातील युवकांवर झालेल्या कारवाईची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या आंदोलनाशी संबंधित प्रश्नांवर सरकारने तातडीने चर्चा करून योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.

निवेदनातील प्रमुख मागण्या :
1)आंदोलनकर्त्यांशी संसदेत तातडीने चर्चा करण्यात यावी.
2)केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा.
3)आंदोलनकर्त्यांवर अत्याचार करणाऱ्या पोलिस व संबंधित व्यक्तींवर चौकशी करून कठोर कारवाई करावी.
4)NEET व इतर परीक्षांमधील गैरव्यवहार रोखण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात.
5आंदोलनादरम्यान जखमी झालेल्या तसेच मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई द्यावी.
6) आंदोलनकर्त्यांवरील दाखल गुन्हे मागे घ्यावेत.
करमाळा तालुका बार असोसिएशनने विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांना पाठिंबा देत केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी भूमिका निवेदनातून मांडली आहे.

