करमाळाक्राईमताज्या घडामोडीसोलापूर जिल्हासोलापूर शहर

बिटरगाव येथे दिवसाढवळ्या घरफोडी ; पावत्या नसल्याने अर्धवट मुद्देमालाची नोंद !

करमाळा समाचार

सावधान… यापूर्वी रात्री अपरात्री घरात कोणी नसल्याचा फायदा घेऊन किंवा कुलूप तोडून चोऱ्या केल्या जात होत्या. परंतु आता चोरांची भीती पूर्णतः कमी झालेली दिसून येत आहे. बिटरगाव श्री येथे दुपारीच वृद्ध दांपत्य शेतीत काम करत असताना चोरट्यांनी घर साफ केले आहे. यावेळी घरात चोरी होत असताना दांपत्य हे बाहेरच शेतीत काम करत होते. सदरच्या घटनेने ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

बिटरगाव श्री येथील जाधव दांपत्य हे शेतीच्या कामानिमित्ताने दोघेही काम करत होते. यावेळी घराला कुलूप लावलेले होते. परिसरात काम करत असताना घरातून कसला तरी आवाज आला यावेळी जाधव यांच्या पत्नी घराकडे गेल्या. त्यांनी पाहिलं एक इसम बाहेर थांबलेला आहे. तर दुसरा आतून काहीतरी घेऊन येत आहे. अशा परिस्थितीत त्याने त्या ठिकाणच्या सोन्या-चांदीच्या वस्तूवर हात साफ केला होता.

जाधव कुटुंबीयांकडे सदरच्या सोन्याच्या पावत्या तात्काळ उपलब्ध नसल्याने गुन्हा नोंद करताना अर्धवट नोंद झाल्याचे दिसून आले. तर मूळ मुद्देमाल हा यापेक्षा जास्त अधिक असू शकतो त्यामुळे केवळ दोन तोळ्याचीच नोंद झाली आहे. सदरच्या घटनेला 24 तास उलटून गेले परिसरात भीतीचे वातावरण असून रात्री तर रात्री दिवसाही आता लोकांना भीतीच्या परिस्थितीत राहावे लागत आहे. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ याचा छडा लावावा अशी मागणी केली जात आहे.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE