करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

बैठका, आंदोलनात वेळ वाया घालवू नका आम्हाला न्याय द्या ; शेतकऱ्यांची हाक

करमाळा समाचार

उजनी जलाशय परिसरात जिल्हाधिकारी यांचा नियम दाखवत वीज कपात करण्यात आली. पण तीच परिस्थिती पुणे व अहमदनगर जिल्ह्यात मात्र उलट असल्याची दिसून येत आहे. एवढंच काय तर माढा तालुक्यातही सहा तास वीज असल्याची माहिती कळत आहे. म्हणजे फक्त करमाळा तालुक्याच्या. पाणी वापरामुळे पाणी संपणार आहे का? तालुक्यातील नेते पुढारी सध्या सत्ताधाऱ्यांच्या बरोबरीने बसलेले आहेत मग लोकांना आंदोलन करण्यासाठी व वेळ घालवण्यासाठी शेतकऱ्यांना कशाला समोर केले जात आहे.

सध्या पावसाळा सुरू आहे. परंतु अपेक्षित असा पाऊस पडला नसला तरी दौंड परिसरातून उजनी जलाशयात पाणी येण्यास सुरुवात झाली आहे, अशी परिस्थिती असताना येणाऱ्या काळात अजूनही पाणी येण्याची शक्यता आहे. पण तरीही केवळ करमाळा तालुक्याने सर्व पाणी संपणार असल्यागत वीज कपातीचा निर्णय कटाक्षाने पाळला जात आहे. यासाठी सध्या नेते मंडळी बैठका घेत असल्या तरी सर्व प्रक्रिया ही वेळ खाऊ असल्याचे दिसत आहे.

आज शेतकऱ्याचे उभ पीक शेतात जळण्याची भीती असताना बैठका, आंदोलन व नियोजन करण्याची वेळ सध्या नसून ती वेळ खाऊ प्रक्रिया आहे असे करत बसण्यापेक्षा प्रत्येकाने आपापल्या नेत्यांकडे पाठपुरावा केलास शेतकऱ्यांना वीज तात्काळ व लवकर उपलब्ध होऊ शकते. वीज तात्काळ उपलब्ध होण्यासाठी आंदोलने करत बसण्यापेक्षा थेट संपर्क साधून नेत्यांकडून काम करून घेणारा नेता सध्या गरजेचा असून सर्व नेते मंडळींनी एकत्र येऊन काम केले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

काही दिवसांनी पुन्हा पावसाळा होईल व आंदोलने व पाठपुराव्याला शून्य किंमत राहणार आहे. परंतु तोपर्यंत उभ पिक जळून जाईल त्यानंतर विज मिळाली तरी त्याचा लाभ होणार नाही अशी परिस्थिती असल्याने तात्काळ यात लक्ष घालून नियोजन करणे गरजेचे आहे. केवळ लोकांना आम्ही तुमच्यासाठी लढतोय, पाळतोय, भांडतोय एवढं दाखवण्यात अर्थ नाही तर काम करून दाखवले पाहिजे.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE