करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

अफवांना ऊत…. डिकसळ पुलाबाबतचा फोटो दिशाभूल करणारा

करमाळा समाचार

तालुक्यातील डिकसळ पुलाबाबत सोशल मीडियावर “पूल कोसळला” अशा मजकुरासह एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मात्र, प्रत्यक्षात हा पूल कोसळलेला नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे घाबरून जाऊ नये असे आवाहन तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी केले आहे.

प्रशासनाने यापूर्वीच सुरक्षेच्या कारणास्तव हा पूल जड वाहतुकीसाठी बंद केला होता. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सोशल मीडियावर पसरत असलेली “पूल पूर्णपणे कोसळला” ही माहिती चुकीची असल्याचे स्पष्ट झाले आहे.

https://youtube.com/shorts/ddoYyRwppkQ?si=tYVXrrNQ_jqn0I_c

नागरिकांनी अपुष्ट माहितीवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीची खात्री करूनच ती पुढे पाठवावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE