करमाळाक्राईमसांगोलासोलापूर जिल्हासोलापूर शहर

देवाभाऊच्या राज्यात देवच असुरक्षित ! ; वाशिंबे येथील मंदिरावर चोरट्याचा डल्ला – विविध घटना समोर

करमाळा समाचार

वाशिंबे गावापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरावर अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास डल्ला मारल्याची घटना समोर आली आहे. जलाशयाच्या काठावर असलेल्या या मंदिरातून सोने-चांदीचे दागिने तसेच काही मूर्ती चोरीला गेल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. याठिकाणी दीड किलो चांदी व सोन्याच्या दागिन्यासह मूर्तीची चोरी झाली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी मंदिर उघडल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. या घटनेमुळे वाशिंबे परिसरात खळबळ उडाली असून भाविकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा व तपासाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. चोरीचा नेमका ऐवज आणि नुकसान किती झाले याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

जलाशयाच्या काठावर आणि गावापासून काही अंतरावर असलेल्या या मंदिरात सुरक्षा व्यवस्था नसल्याने चोरट्यांनी संधी साधल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, संशयित हालचाली आणि इतर तांत्रिक बाबींच्या आधारे पोलिसांकडून तपास सुरू आहे.

गेल्या महिनाभरात मंदिर चोरीच्या घटना सातत्याने समोर येत असून, ग्रामदैवतांच्या मंदिरांपासून मोठ्या देवस्थानांपर्यंत चोरट्यांनी डल्ला मारल्याने भाविकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. मोजक्या समोर आलेल्या घटनांवर नजर टाकली तरी परिस्थिती गंभीर असल्याचे दिसून येते.
प्रमुख घटना :
🔹 २० जून – राजुरी (ता. सांगोला, जि. सोलापूर) ग्रामदैवत लक्ष्मी मातेच्या मंदिरात चोरी झाली. मंदिरातील चांदीचा मुखवटा, सोन्याचे डोळे, सोन्याचे मनी तसेच मंगळसूत्र चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली.
🔹 १३ जून – अंबप फाटा, हातकणंगले श्री स्वामी समर्थ मंदिरात चोरट्यांनी धाड टाकून मूर्तींसह इतर साहित्य लंपास केले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.
🔹 १२ जून – इंदोरी, तळेगाव दाभाडे एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील ग्रामदैवत कडजाई माता मंदिरात चोरीची घटना घडली. मंदिरातील मौल्यवान वस्तूंवर चोरट्यांनी हात साफ केला.
🔹 २३ मे – तळेगाव दाभाडे, पुणे जिल्हा तुळजाभवानी मंदिरातील चांदीचा मुकुट चोरीला गेला. विशेष म्हणजे नव्याने प्रतिष्ठापना केल्यानंतर अवघ्या २४ तासांतच ही घटना घडली होती.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE