करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

वीजेची वेळ वाढ़ करण्यासाठी शेतकऱ्यांची मैदानात उडी ; 26 पासून आंदोलन

करमाळा प्रतिनिधी :


उजनी जलाशय परिसरातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी शेतीपंपासाठी नियमित आठ तास वीजपुरवठ्याची मागणी करत जिल्हाधिकारी, सोलापूर यांच्याकडे निवेदन दिले आहे. मागणी मान्य न झाल्यास 26 जुलै 2026 पासून करमाळा तालुक्यातील चिखलठाण (टोपेबाबा मंदिरासमोर) येथे आमरण उपोषण करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

तालुक्यातील नेत्यांनी प्रयत्न केले पण पाणी जसं वाढू लागलं तस विजेची मर्यादा वाढत गेली. दोन तासाहून आता पाच तासापर्यंत वीज वाढ करण्यात आलेली आहे. पण इतर तालुक्याच्या तुलनेने ज्या शेतकऱ्यांनी अधिकची शेती दिली त्यांना मागे ठेवण्यात येत असल्याची भावना शेतकरी व्यक्त करू लागले आहेत. आता नेत्यांच्या भरोशावर न राहता स्वतः शेतकरी मैदानात उतरलेला दिसून येत आहे. याबाबत आज एक निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, उजनी प्रकल्पासाठी सुपीक शेती व घरे संपादित करण्यात आली असून प्रकल्पग्रस्तांवर अन्याय झाला आहे. चालू वर्षात उजनी धरणाची पाणीपातळी वेगाने वाढत असून धरण जवळपास अर्ध्याहून अधिक भरले आहे आणि १०० टक्के भरण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. असे असतानाही शेतीपंपांना केवळ पाच तास वीज मिळत असल्याने शेतीचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

ad

यामुळे शेतीपंपासाठी नियमित आठ तास वीजपुरवठा तातडीने सुरू करावा, अन्यथा 26 जुलैपासून आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा अर्जदारांनी प्रशासनाला दिला आहे. या निवेदनावर इन्नूस दिलावर सय्यद, अविनाश सरडे, योगेश सरडे, सचिन गावडे, शंकर बोंद्रे, दादासाहेब सरडे, रणजित गव्हाणे, संदीप सरडे आदी प्रकल्पग्रस्तांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE