करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

अंडे फुटायच्या आधीच पिल्ले मोजण्याची घाई : चार तास वीज… पण कौतुक सहा तासांचे? शेतकऱ्यांमध्ये संभ्रम

करमाळा समाचार


करमाळा तालुक्यात शेतीपंपासाठीच्या वीजपुरवठ्यात एक तासाची वाढ करण्यात आली असून प्रत्यक्षात चार तास वीज उपलब्ध होत आहे. मात्र, काही ठिकाणी अर्धवट किंवा अपूर्ण माहितीच्या आधारे शेतकऱ्यांना सहा तास वीज मिळाल्याचा प्रचार केला जात असल्याची चर्चा सुरू आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

सुरुवातीला करमाळा वगळता सर्वत्र सहा तास वीज असल्याने शेतकऱ्यांनी तालुक्यातही उजनी काठ सहा तास वीज करण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. परंतु केवळ एक तास वीज करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसली. नुकतच विविध गटातटातील नेत्यांनी सर्वत्र प्रयत्न केले. तरी केवळ एक तास वाढीव दिल्याने पुन्हा एकदा शेतकऱ्यांची थट्टा केल्याचे दिसून येत आहे.

प्रत्यक्षात वीजपुरवठा चार तासांचा असतानाही “सहा तास वीज मिळाली” अशा पद्धतीने कौतुक केल्याने वास्तव परिस्थिती झाकोळली जात असल्याची भावना व्यक्त होत आहे. दुसरीकडे, विविध लोकप्रतिनिधी आणि शेतकरी संघटना अजूनही शेतीसाठी नियमित सहा तास वीजपुरवठ्याची मागणी करत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, एक तासाची वाढ हा प्रश्नाचा कायमस्वरूपी तोडगा नसून शेतकऱ्यांच्या गरजेनुसार सहा तासांचा नियमित वीजपुरवठा मिळाल्यानंतरच शेतीला खऱ्या अर्थाने दिलासा मिळेल.

त्यामुळे शेतकऱ्यांचे मत स्पष्ट आहे—प्रत्यक्षात जितकी वीज मिळते, तितकीच माहिती जनतेसमोर यावी; अर्धवट माहितीच्या आधारे श्रेय घेण्याऐवजी शेतकऱ्यांना आवश्यक असलेले सहा तास वीजपुरवठा मिळवून देण्यावर भर द्यावा. तालुक्यात सध्या “एक तास वाढीचे कौतुक” आणि “सहा तास वीजपुरवठ्याची मागणी” या दोन भूमिका समोर येत असून, अंतिम निर्णयाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE