शेतकऱ्यांसाठी खुशखबर – हळगाव ला पाणी नेण्याच्या कार्यवाहीला ब्रेक ; रश्मी बागल यांची थेट विखे पाटलांसोबत चर्चा
करमाळा समाचार

सध्या मांगी विषयावरून वातावरण तापलेले असताना करमाळा तालुक्याच्या भाजपाच्या वतीने पुढाकार घेत भाजपा महिला मोर्चा उपाध्यक्ष रश्मी बागल यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन संबंधित प्रकरण उजेडात आणले आहे. त्यामुळे त्यांनी तात्काळ दखल घेत संपूर्ण माहिती घेऊन प्रकरण मार्गी लावावे तसेच सध्या विषयाला स्थगिती द्यावी अशा सूचना संबंधित विभागाला दिल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी हाती घेतलेले आंदोलनाला यश मिळताना दिसत आहे.

बऱ्याच दिवसांपासून मांगी तलावातील पाणी हळगाव कृषी महाविद्यालयाला पाठवणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. शिवाय याची प्रक्रियाही सुरु केलेली असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे मांगी तलावातच पाणी नाही मग इथून पाठवून शेतकऱ्यांचे नुकसान का करतात? असा प्रश्न विचारत आधी मागित पाणी आणा व नंतर पाणी पुढे न्या अशी भूमिका रश्मी बागल यांनीच प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली होती. त्यानंतर मध्यंतरीच्या काळात निवडणुका व इतर कारणांमुळे हा विषय थांबलेला होता.
पुन्हा एकदा हा विषय चर्चेला आल्यानंतर सर्वांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. शेतकरी रस्त्या उतरले जन आंदोलन उभे झाले. पालकमंत्री जयकुमार गोरे विधान परिषदेचे आमदार राम शिंदे यांच्याकडेही विचारणा करण्यात आली. त्यांना अडचणी सांगण्यात आल्या. परंतु अपेक्षित असे यश येताना दिसत नव्हते. त्यानंतर भाजपा नेत्या रश्मी बागल यांनी विखे पाटलांची थेट भेट घेत या प्रश्न लक्ष घालण्याची विनंती केली. त्यानंतर विखे पाटील यांनी प्रकरणाला स्थगिती दिली असून पुढील काय निर्णय होईल याकडे लक्ष लागून राहिले आहे.


