सभापतींनी कामचलावू माहिती देत वेळ मारून नेल्याचा आरोप; कुकडीच्या पाण्याबाबत दिशाभूल झाल्याने संताप
करमाळा समाचार | प्रतिनिधी

सभापती साहेब हे कर्जत जामखेड मतदारसंघाचे माजी आमदार असून या ठिकाणी विकास कामे करण्याचा त्यांचा हेतू आहे. पण ते करत असताना विद्यार्थ्यांच्या नावाखाली शेजारच्या तालुक्यातील शेतकऱ्यावर अन्याय कशासाठी? शेतकऱ्यांच्या जीवापेक्षा नियोजित प्रकल्प महत्त्वाचा आहे काय? मांगीच्या पाण्यावरून विचारलेल्या प्रश्नावर सभापतींच्या उत्तरात जबाबदारी चा अभाव दिसून आला. आपण महाराष्ट्र चालवता मग आपल्या महत्वकाक्षी योजनेसाठी आमच्यावर अन्याय का? असा प्रश्न शेतकरी विचारू लागले आहेत.

विधान परिषद सभापती यांनी संबंधित प्रश्नावर कामचलावू माहिती देत वेळ मारून नेल्याचा आरोप करण्यात येत असून, कुकडीच्या पाण्याबाबत दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोपही नागरिक व शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.
मांगी गावाचा कुकडी प्रकल्पामध्ये समावेश नसतानाही त्यासंदर्भात चुकीची माहिती देण्यात आल्याचे टीकाकारांचे म्हणणे आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी अन्यत्र वळविण्याच्या भूमिकेला प्राधान्य दिले जात असल्याबाबतही नाराजी व्यक्त केली जात आहे.
स्थानिक शेतकरी व नागरिकांच्या मते, पाणीटंचाईच्या परिस्थितीत शेतीसाठी उपलब्ध असलेल्या पाण्याबाबत कोणताही निर्णय घेताना शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले पाहिजे. कुकडीच्या पाण्याच्या वाटपाबाबत स्पष्ट आणि वस्तुनिष्ठ माहिती शासनाने द्यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात येत आहे.

सभापती म्हणाले कुकडीच्या पाण्यात मांगीचा समावेश आहे. पण बऱ्याच मांगीचा समावेश नसल्याने आधीच पाणी मांगी पर्यंत येत नाही पावसाच्या पाण्यावर पाण्याचे नियोजन चालते. त्यामुळे मांगी दोन ते तीन वर्ष रिकामी असतें शिवाय स्थानिक शेतकऱ्यांना यातून पाणी मिळत नाही मग बाहेर नेताना नियोजन करणारे झोपा काढत होते काय? दरम्यान, या प्रकरणावर संबंधित प्रशासन व लोकप्रतिनिधींकडून अधिकृत भूमिका समोर येणे अपेक्षित असून, कुकडीच्या पाण्याबाबत निर्माण झालेला संभ्रम दूर करण्याची मागणी होत आहे.


