मी राजकारण करीत नाही भरणे माझे मित्र ; … तर संजयमामांचा कार्यकर्ता म्हणुन काम करेल
प्रतिनिधी कुर्डूवाडी
सोलापूर जिल्ह्याचे ५ टीएमसी पाणी जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पळवले आणि सोलापूर वातावरण ऐन उन्हाळ्यात तापले आहे. दत्तामामा भरणे यांच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी अनेक राजकीय नेत्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे, मी राजकारण करत नाही, माझे आणि दत्ता भरणे यांचं मैत्रीचे संबंध आहेत असे अतुल खूपसे यांनी बोलताना सांगितले.

पुढे बोलताना अतुल खूपसे म्हणाले की, आ. संजयमामा शिंदेंची ओळख सोलापूर जिल्ह्याचे नेते म्हणून आहे. जर संजय मामा सोलापूर जिल्ह्याचे नेते असतील तर त्यांनी सोलापूर जिल्हयातील शेतकऱ्यांसाठी सोलापूर जिल्ह्याच्या हक्काच्या पाण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांना याबाबत जाब विचारून, त्यांच्या विरोधात आंदोलन करावे. तर मी त्यांचा कार्यकर्ता म्हणून काम करायला तयार आहे. नुसती पेपर बाजी शेतकऱ्यांची बाजू घेऊ नका. प्रत्यक्षात समोर येऊन काम करा. राजकारण करू नका फक्त माझ्या शेतकऱ्याला वाचवा. असे आवाहन अतुल खूपसे यांनी करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे यांना केलं आहे. पाणी जरी दत्तात्रय भरणे यांनी नेले असले तरी त्यांचे मार्गदर्शक बारामतीकर आहेत. संजय शिंदेंचे नेते पण अजित पवार आहेत. आणि दत्ता भरणेंचे पण नेते अजित पवार आहेत.
मग आमदार संजय शिंदेंनी राजकारण बाजूला ठेऊन स्वतःला सोलापूर जिल्ह्याचे नेते म्हणता ना? मग समोर येऊन अजित पवारांना जाब विचारावा. आणि त्यांच्या विरोधात आंदोलनाला उभ रहाव. तर शेतकरी तुम्हाला पाठिंबा देतील. नुसते जिल्ह्याचे नेते म्हणून चालत नाही, त्यासाठी जिल्ह्याची काम पण करावी लागतात. आज सर्व शेतकरी एक झाला आहे. आपण पण एक होऊन आंदोलन करावे. मी अतुल खुपसे आपला कार्यकर्ता होईल.

अशा शब्दात शेतकरी नेते अतुल खूपसे यांनी आमदार संजय शिंदे यांना आवाहन केले आहे. सोलापूर जिल्ह्यातील नेत्यांचा तसेच शेतकरी वर्गाचा खूपसे यांना पाठिंबा मिळत असल्याने येत्या काही दिवसात जिल्ह्यात मोठ आंदोलन भडकण्याची शक्यता वर्तविली जात आहे.