करमाळासोलापूर जिल्हा

उद्या करमाळा बंद … करमाळ्यात शिवप्रेमी आक्रमक मिळतोय मोठा पाठिंबा

करमाळा समाचार

यासंदर्भात असे पोस्टर सोशल माध्यमातून पाठवले आहेत

छत्रपती शिवाजी महाराज व महापुरुषांचे यांची वारंवार होणारी बदनामी थांबवणे बाबत तसेच ज्यांनी महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले आहेत त्यांचा निषेध म्हणून बुधवार दिनांक ७ डिसेंबर रोजी करमाळा बंद चे आवाहन करमाळा तालुका शिवभक्तांच्या वतीने करण्यात आले आहे. सदरच्या बंदला रिपाई, मुस्लिम संघटना, किराणा असोसिएशन व इतर संघटनांनी पाठिंबा दिला आहे.

यावेळी विविध पक्षाचे पदाधिकारीही उपस्थित होते. बेताल वक्तव्यांचा निषेध करीत विरोधात घोषणाही देण्यात आल्या. याबाबतचे निवेदन तहसीलदार समीर माने व पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांना देण्यात आले आहे. सदरचे निवेदन सोमवारी सकाळी आकाराच्या सुमारास देण्यात आले. त्यानंतर आरपीय (आठवले गट) यांच्यावतीनेही महापुरुषांच्या बाबत होणाऱ्य वक्तव्यांचा निषेध करीत पाठिंब्याचे पत्र तहसिलदार यांना दिले आहे.

महाराष्ट्रामध्ये सध्या राजकीय स्थीरतेचे भान कोणालाच राहिले नसून त्यामध्ये संविधानिक पदावर असलेले राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल वारंवार अपमान जनक वक्तव्य करून महाराष्ट्रामध्ये वाद-विवाद व सामाजिक अस्थिरता निर्माण करण्यास कारणीभूत असणाऱ्या भगतसिंह कोशारी राज्यपाल पदावरून हकालपट्टी करण्यात यावी.

भाजपा प्रवक्ता सुधांशू त्रिवेदी, प्रसाद लाड, रावसाहेब दानवे, मंगल प्रसाद लोढा यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी व त्यांना महाराष्ट्रात फिरण्यास मनाई करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आले आहे. यावेळी बेताल वक्तव्यांबद्दल करमाळा तहसील आवारात शिवभक्तांनी निषेध व्यक्त केला. तर ७ डिसेंबर रोजी करमाळा बंद ठेवण्याचं आवाहन केले आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE