आदिशक्ती अभियानात वाशिंबे ग्रामपंचायतीचा जिल्हाभर डंका
करमाळा समाचार

करमाळा तालुक्यातील वाशिंबे ग्रामपंचायतीने ‘आदिशक्ती अभियानात’ उल्लेखनीय कामगिरी करत जिल्हास्तरीय द्वितीय क्रमांक व तालुकास्तरीय प्रथम क्रमांकाचा मान पटकावला आहे. या यशामुळे ग्रामपंचायत वाशिंबेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून गावावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

या अभियानात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल जिल्हास्तरीय पुरस्कार म्हणून ₹3 लाख तर तालुकास्तरीय पुरस्कार म्हणून ₹1 लाख अशी एकूण ₹4 लाखांची पुरस्कार रक्कम ग्रामपंचायतीला प्राप्त झाली आहे.
या यशामागे अंगणवाडी कर्मचारी, आशा सेविका, बचतगट अध्यक्षा, सीआरपी, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, पोलिस पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी, संगणक ऑपरेटर, सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामपंचायत अधिकारी यांच्या सामूहिक परिश्रमांचा मोठा वाटा आहे.

या अभियानासाठी मा. श्री. डॉ. अमित कदम साहेब, गटविकास अधिकारी, पंचायत समिती करमाळा तसेच मा. श्री. किरण सूर्यवंशी साहेब, सीडीपीओ, करमाळा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावी नियोजन व अंमलबजावणी करण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच ग्रामपंचायतीला हे उल्लेखनीय यश मिळाल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
या गौरवशाली यशाबद्दल ग्रामपंचायतीतील सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत असून, भविष्यातही अशीच उत्कृष्ट कामगिरी करून गावाचा नावलौकिक वाढविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.


