करमाळासकारात्मकसोलापूर जिल्हासोलापूर शहर

करमाळ्याच्या मंडलिकची ‘तेजस्वी’ कामागिरी ; विद्यापीठात सुवर्णपदक पटकावले

करमाळा समाचार

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील बी.ए. इंग्रजी विषयातील विद्यार्थिनी कु. तेजस्विनी संतोष मंडलीक हिने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या २२ व्या दीक्षांत समारंभात विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक पटकावले आहे. या अभूतपूर्व यशाबद्दल महाविद्यालयातर्फे तिचे विशेष अभिनंदन करण्यात आले.

महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. अभिमन्यू माने यांनी तेजस्विनीचे हृदयपूर्वक अभिनंदन करताना म्हटले की, “तेजस्विनी ही आमच्या महाविद्यालयाची अभिमानास्पद विद्यार्थिनी आहे. तिच्या अथक परिश्रम, समर्पण आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर तिने विद्यापीठ स्तरावर महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले आहे. हे यश केवळ तिचे वैयक्तिक नाही तर संपूर्ण महाविद्यालयासाठी प्रेरणादायी आहे.”

विद्या विकास मंडळाचे सचिव मा. विलासराव घुमरे यांनी तिच्या यशा बद्दल विशेष गौरव उद्गार काढले:

ad

“तेजस्विनी मंडलीकने मिळवलेले हे यश केवळ एका विद्यार्थिनीचे नाही, तर संपूर्ण यशवंत परिवारासाठी अभिमानाचा क्षण आहे. तिने बी.ए. इंग्रजीमध्ये विद्यापीठात प्रथम येऊन सुवर्णपदक मिळवल्याने आमच्या महाविद्यालयाची शैक्षणिक परंपरा अधिक समृद्ध झाली आहे. तिची मेहनत, एकाग्रता आणि ध्येयनिष्ठा पाहून खरोखरच अभिमान वाटतो. अशा विद्यार्थ्यांमुळे आम्हाला भविष्यात अजून उत्तम यशाची अपेक्षा आहे. तेजस्विनीला हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा!”

विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष मा. मिलिंद फंड, प्रा. खरात, प्रा. मुळीक व महाविद्यालयातील सर्व शिक्षक-कर्मचारी यांनीही कु. तेजस्विनी मंडलीकचे खूप अभिनंदन केले. तिच्या भविष्यातील उज्ज्वल वाटचालीसाठी सर्वांनी हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE