करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

मतदार यादी कार्यक्रमाला मुदतवाढ; ग्रामपंचायत निवडणुकांबाबत राज्य निवडणूक आयोगाचे निर्देश

प्रतिनिधी :

राज्यातील बिगर व अंशतः अनुसूचित क्षेत्रातील सन २०२४ व २०२५ मध्ये मुदत संपलेल्या तसेच सन २०२६ मध्ये मुदत संपणाऱ्या आणि नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादी तयार करण्याच्या कार्यक्रमाला राज्य निवडणूक आयोगाने मुदतवाढ दिली आहे. यामुळे 18 वय पूर्ण असलेल्या युवा मतदारांना फायदा होऊ शकतो. याबाबत करमाळा राष्ट्रवादी( अजित पवार गट) चे कार्याध्यक्ष सुजित बागल यांनी न्यायालयात जाण्याचा इशारा दिला होता एकाप्रकारे त्यांच्या मागणीला यश आले आहे.

राज्य निवडणूक आयोगाने २४ जुलै २०२६ रोजी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रानुसार, भारत निवडणूक आयोगाकडून सुरू असलेल्या स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (SIR-2026) कार्यक्रमामुळे तसेच विविध जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या विनंतीचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे.

पूर्वीच्या कार्यक्रमानुसार २४ जुलै रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार होती. मात्र आता ती प्रसिद्ध करण्यात येणार नसून सुधारित कार्यक्रम लवकरच जाहीर केला जाणार आहे. विधानसभा मतदारसंघांच्या अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

ad

राज्य निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, राज्यातील सुमारे १५ हजार ग्रामपंचायतींपैकी बहुतांश ग्रामपंचायतींच्या प्रारूप मतदार याद्या तयार झाल्या आहेत. तरीही अंतिम निर्णय होईपर्यंत त्या प्रसिद्ध न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे संबंधित ग्रामपंचायत निवडणुकांच्या प्रक्रियेलाही काही काळ विलंब होण्याची शक्यता असून, सुधारित निवडणूक कार्यक्रमाची आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE