करमाळासोलापूर जिल्हा

मनसेने खंत व्यक्त केल्यावर रुग्णवाहीका कोविड सेवेत ; तर रेमडीसिवीर पुरवठाही वाढवण्यात येणार असल्याची आ. शिंदेंची माहीती

करमाळा समाचार 

करमाळा तालुक्यामध्ये यापूर्वी उपजिल्हा रुग्णालय करमाळा , शहा हॉस्पिटल व पवार हॉस्पिटल या तीनच हॉस्पिटलला अधिकृत कोवीड केअर सेंटर म्हणून मान्यता मिळालेली होती. त्यामुळे या तीन ठिकाणी असणाऱ्या रुग्णांच्या संख्येनुसार करमाळा तालुक्याला अत्यल्प स्वरूपामध्ये इंजेक्शन उपलब्ध होत होते.

नव्याने अधिकृत सेंटरच्या मान्यतेचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दिले होते. त्यानुसार करमाळा शहरातील लोकरे हॉस्पिटल, शेलार हॉस्पिटल व ग्रामीण रुग्णालय जेऊर या तीन ठिकाणी नव्याने कोवि ड केअर सेंटरला अधिकृत मान्यता मिळाल्यामुळे करमाळा तालुक्यासाठी इंजेक्शनचा कोटा वाढवून मिळणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय, प्रांत कार्यालय यांच्याशी बोलणे झाले असल्याची माहिती आ. संजयमामा शिंदे यांनी दिली.

आमदार निधीतून दिलेली रुग्णवाहिका लवकरच कोरोना रुग्णांसाठी उपयोगात आणणार… उपलब्ध नसल्याने मनसेने खंत व्यक्त केली होती.. 
आमदार स्थानिक विकास निधी मधून मतदार संघासाठी आपण दोन रुग्णवाहिका दिलेल्या असून त्यापैकी एक कुर्डुवाडी व दुसरी करमाळा उपजिल्हा रुग्णालयाला दिलेली आहे. या रुग्णवाहिकेसाठी ऑक्सिजनचे किट बसवणे बाकी असल्यामुळे ती रुग्णवाहिका कोरोना रुग्णांसाठी वापरात आणली जात नव्हती .दोन दिवसात तात्पुरत्या स्वरूपात सिलेंडर चा उपयोग करून ऑक्सीजनची सोय या रुग्णवाहिकेतमध्ये केली जाणार आहे. त्यामुळे करमाळा उपजिल्हा रुग्णालयाला दिलेली रुग्णवाहिका लवकरच कोरोना रुग्णांसाठी उपयोगात आणली जाणार आहे अशी माहिती आ. संजयमामा शिंदे यांनी यावेळी दिली.  तर आ. शिंदे यांनी दिलेली रुग्णवाहिका कोविड सेवेत नसल्याने मनसे अध्यक्ष संजय घोलप यांनी खंत व्यक्त केली होती. त्यानंतर ही रुग्णवाहिका कोविड रुग्णासाठी उपलब्ध झाल्याने आ. शिंदेंनी लगेच दखल घेतल्याचे दिसुन येत आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE