तीन जिल्ह्यांच्या सरहद्दीवरील निळकंठेश्वर यात्रा रद्द ; नियमाचे पालन न केल्यास फौजदारी गुन्हे दाखल करणार आपत्ती व्यवस्थापन समिती कात्रज
जिंती प्रतिनिधी – दिलीप दंगाणे
करमाळा तालुक्यातील शेवटच्या टोकाला पुणे, नगर, सोलापूर जिल्ह्याच्या सरहद्दीवरील भीमा नदीच्या काठावरती निळकंठेश्वराचे भव्य दिव्य मंदिर असून तिन्ही जिल्ह्यातील भाविक महाशिवरात्रि दिवशी मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. परंतु जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या आदेशानुसार कोरोनाविषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायोजना आपत्ती व्यवस्थापन समिती कात्रज यांनी केली आहे.


त्यानुसार ग्रामपंचायत ग्रामपंचायत हद्दीतील असणारे निळकंठेश्वर मंदिरात व आवारात दिनांक 11 /03 /2021 या दिवशी देवस्थानची नियमित पूजा फक्त देवस्थानचे पुजारीच करतील. महाशिवरात्रि दिवशी मंदिरातील दर्शन अभिषेक पालखी, दिंड्या, कीर्तन प्रवचन सर्व प्रकारचे धार्मिक कार्यक्रम बंद ठेवले जाणार आहेत. भाविकांनी प्रशासनाला व आपत्ती व्यवस्थापन समितीला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच महाशिवरात्री दिवशी भाविकांनी मंदिर परिसरात येऊ नये. परिसरात व्यवसायिकांनी कोणत्याही प्रकारचे आपले दुकान स्टॉल लावू नये नियमांचे काटेकोरपणे पालन करावे नियमाचे उल्लंघन करणारांवरती फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशाराही आपत्ती व्यवस्थापन समिती कात्रज यांनी दिला आहे.