आता लसीकरणासाठीची प्रतिक्षा संपली ; करमाळा शहरात पहिले सशुल्क लसिकरण केंद्र सुरु
करमाळा समाचार
करमाळा तालुका डॉक्टर्स असोसिएशन (KTMP)व खोसे हाॅस्पिटल यांच्या संयुक्त विध्यमाने कोविड लसीकरण केंद्राचे उदघाटन संपन्न झाले आहे.

आज दिनांक 31/07/2021 रोजी करमाळा तालुक्यातील व शहरातील पहिल्या सरकारमान्य खाजगी कोविड लसीकरण केंद्राचे उदघाटन डॉ कॉग्रेकर व नगरसेवक संजय सावंत यांच्या हस्ते संपन्न झाले.

यावेळी करमाळा शहर व परिसरातील सर्व डॉक्टर्स व नागरिक उपस्थित होते. या लसीकरण केंद्रात 18 वर्षावरील सर्व नागरिकांना कोविड लस दिली जाणार असून सर्व नागरिकांनी याचा फायदा घ्यावा आपले नाव नोंदणी साठी खालील लिंक वर आपली नोंदणी करावी
संपर्क (Covishield Vaccine)
9146640417
9423337471
cowin.gov.in.