परप्रांतीय कारागिर व्यापाऱ्यांचा स्थानिक ग्राहकांवर दबाव ; वेळीच सावध होण्याची गरज
करमाळा समाचार
ज्या पद्धतीने मुंबईमध्ये अमराठी भाषिकांची संख्या वाढल्यानंतर आपली ताकद दाखवण्यासाठी सुरुवात केली आहे काहीशी तशीच पद्धत आता ग्रामीण भागातही आतापासूनच दिसू लागली आहे. सुरुवातीला एक दोन च्या प्रमाणात गावोगावी कामानिमित्त येणारे अमराठी लोकांची संख्या आता वरच्यावर वाढत चालली आहे आणि त्यांच्याकडूनही व्यावसायिक दृष्टिकोनातून स्थानिकांवर नियम व अटी लागल्या जाऊ लागल्या आहेत. त्यामुळे येणारा काळ हा शहरीसह ग्रामीण भागातही अडचणीचा ठरतोय की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे.

शहरी भागात सुरुवातीला संख्या कमी असताना स्थानिकांना बरोबर घेऊन जाण्याची काम केले जात होते. पण आता जशास तसे उत्तर दिले जाऊ लागल्याने त्या ठिकाणी अडचणीत वाढ झाली आहे. तर तालुका पातळी व ग्रामीण भागातही अशी मराठी लोक सध्या कामाच्या निमित्ताने आलेले असताना सुरुवातीला आपला जम बसवला. तर आता आमच्या सांगण्यावरून आमच्या लोकांकडूनच वस्तू घेतल्यास आम्ही तुमचे काम करू असा एक प्रकारे अलिखित नियम मराठी लोकांनी स्थानिकांवर लादलेला दिसून येत आहे. यामुळे त्यांची व्यावसायिक दृष्ट्या मनमानी वाढत असून येणाऱ्या काळात स्थानिक लोकांची धंदे व हातचे काम संपूर्ण हस्तगत करण्याचा डाव त्यांचा असल्याचा दिसून येत आहे.
मराठी लोकांनी ग्रामीण भागात स्टील, फरशी, पीओपी, बांधकाम, खाण्याच्या स्टॉल यासारख्या धंद्यांना करमाळा व परिसरात सुरुवात केलेली आहे. या ठिकाणी पण परप्रांतीय खाद्यांना मोठ्या प्रमाणावर पसंती ही दिली जाते. बऱ्याच ठिकाणी रहदारीच्या ठिकाणी यांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. तर सुरुवातीला एखादी दुकान असताना आता अमराठी लोकांच्या दुकानांमध्येही वाढ होताना दिसत आहे. फरशी, पीओपीसाठी मराठी लोक कामाचा दर्जा चांगला असल्याने स्थानिक लोकांकडुन आवर्जून पसंती दिली जातेय. परंतु सदरचे कारागीर हे आमच्याच माणसाच्या दुकानातून सदरचा माल आणला तरच आम्ही त्या मालाची जबाबदारी घेऊ शकतो असा धमकी वजा इशारा दिला जात असल्याने स्थानिकांना फरशी तसेच पीओपी च्या वस्तू या अमराठी लोकांकडूनच घ्यावे लागत आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात फक्त अमराठी लोकांचे व्यवसाय या ठिकाणी तेजीत तर स्थानिकांचे व्यवसाय हे बंद पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वेळीच याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.

मराठी माणसाचा पारंपारिक व्यवसाय हा शेती राहिलेला आहे. याशिवाय साधारण कामे करून या ठिकाणी उपजीविका चालते. परंतु बाहेरून आलेला अमराठी व्यक्ती कुटुंबाशिवाय एकटा या ठिकाणी येतो. त्यामुळे त्याचा खर्चही कमी असतो अशा परिस्थीतीत तो मिळेल त्या पैशात काम करण्याची त्याची तयारी असते. त्यामुळे स्वस्तात व वेळ देऊन काम केल्यामुळे त्यांनी उद्योग धंद्यात जम बसवला आहे. मराठी लोकांना सदरचा नवा व्यवसाय सुरू करण्यासाठी संधी जरी असली तरी अमराठी दुकानदारांकडून मात्र अपेक्षित असा प्रतिसाद मिळत नाही. तर दुसरीकडे अमराठी लोक एकमेकांना सांभाळून घेतात व त्यांच्या संख्येत व व्यवसायात व्हावी या दृष्टिकोनातून काम करताना दिसून येतात.
सुरुवातीला तालुक्यात मोजकेच लोक कामाच्या निमित्ताने आलेले होते. पण आता त्यांचा भरणा मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. तर मराठी लोकांपेक्षा अमराठी लोकांच्या उद्योग धंद्यातही मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली दिसून येत आहे. भरमसाठ मोठी दुकाने या ठिकाणी थाटलेली आहेत. मराठी लोकांच्या धंद्यात आव्हान देण्याचे काम केले गेले आहे. तर बाहेरून येणारे लोंढे वाढत असताना सुरक्षेच्या दृष्टीनेही यांची नोंद पोलिसात असणे गरजेचे आहे. याशिवाय स्थानिक नागरीकांनी वेळीच जागे होण्याची गरज आहे. त्यांच्या इशाऱ्यावर नाचु नका स्थानिक व्यवसायीकांकडेच माल खरेदी करा.
– संजय घोलप, मनसे तालुकाध्यक्ष.
