रोहित्राचे काम करताना वीजेचा झटका बसुन कर्मचाऱ्याचा मृत्यु ; दोन तासांपासुन मृतदेह त्याच अवस्थेत
करमाळा समाचार
करमाळा कर्जत रोडवर रायगाव हद्दीत जाधव गुरुजी यांच्या घराशेजारी रोहित्राचा घोटाळ्याचे काम करण्यासाठी गेल्यानंतर नितिन भाऊसाहेब पाटील भोसे यांचे विजेचा धक्का बसून जागीच मृत्यू झाला आहे.

तर मागील दोन तासापासून मृतदेह तसाच पोलवरती लटकून असतानाही महावितरणचे कर्मचारी अद्याप पोहोचले नसल्याने ग्रामस्थ नाराज झाले आहेत. तर संबंधित कुटुंबाला त्याची भरपाई व जबाबदार व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
