ताज्या घडामोडीसोलापूर जिल्हा

प्रतिक्षा संपली कोरोनाची लस देण्याची तयारी पुर्ण ; आमदार शिंदेची माहीती

प्रतिनिधी – करमाळा 

करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात 60 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना शनिवारपासून कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे .तसेच 45 पेक्षा अधिक वय असलेल्या परंतु किडनी, हृदय अशा दुर्धर आजारांनी ग्रस्त असलेल्या नागरिकांनाही ही लस देण्यात येणार आहे अशी माहिती करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली .

सदर लस मिळण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी आपले आधार कार्ड सोबत घेऊन जावे .तसेच 45 वयापेक्षा जास्त वय असलेल्या व दुर्धर आजारांनी ग्रस्त असलेल्या नागरिकांनी ज्या हॉस्पिटलमध्ये आपले उपचार सुरू आहेत त्या हॉस्पिटलचे पत्र सोबत घेऊन यावे असे आवाहन आमदार शिंदे यांनी केले आहे.
सदर लस करमाळ्यातील उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध होणार असल्यामुळे जेष्ठ नागरिक आणि दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांची गैरसोय त्यामुळे थांबणार आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE