रेल्वे पुलासाठी आणलेल्या लोखंडी गज व सिमेंटची चोरी ; करमाळा तालुक्यातील प्रकार
करमाळा समाचार
पोफळज ता. करमाळा शिवारात वेताळबाबा मंदीराजवळ रेल्वे पुलाच्या कामासाठी ठेवलेले लोखंडी गज व सिमेंटचे १०० पोती असा एकुण ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्या प्रकरणी एका अज्ञात चोरा विरोधात करमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा प्रकार २० जुन ते २१ जुन व २५ जुन ते २६ जुन दरम्यान घडला आहे. याप्रकरणी किरण आत्माराम देशमुख (वय ४६) रा. केडगाव ता. दौंड जिल्हा पुणे यांनी फिर्याद दिली आहे.

पोफळज शिवारात रेल्वे पुलाचे काम सुरु असल्याने मंदीराजवळ लोखडी गज व सिमेंट पोते ठेवलेले होते. त्यावर पाळत ठेऊन अनोळखी अज्ञात इसमाने चाळीस हजार पाचशे रुपयांचे १६ एम एम ३८० नग ९०० किलो वजनाचे व सिमेंट चे १०० पोती २२ हजार किंमतीचे असे एकुण ६२ हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे.