जेऊरच्या दिग्दर्शक यांचे हिंदी वेबसीरीजमध्ये पदार्पण ; अधुरी सुहागरात पासुन होणार पदार्पण
करमाळा समाचार
जेऊर येथील मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक विशाल राजकुमार कांबळे यांनी व्ही. आर. के. फिल्म प्रोडक्शन निर्मित “अधुरी सुहागरात” या हिंदी वेबसीरीज मध्ये नव्याने पदार्पण केले. तसेच या वेबसीरीज चे दिग्दर्शक अक्षय सुतार हे असुन कथा भावनिक न होता या मधील आशय महत्त्वाचे आहेत असे मत लेखक श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केले.

या वेबसीरीज चे उद्घाटन पोपट कांबळे व विशाल राजकुमार कांबळे यांनी केले. यावेळी कॅमेरामन गणेश पवार, साउंड रेकॉर्डिंस्ट सुरज पात्रो हे उपस्थित होते. व या वेबसीरीजमध्ये कलाकार रेखा सरकार, अजयकुमार, पोपट कांबळे , संदेश साबळे, विभुती, महेश महाळसेकर, भगवंत घुंबाडे, विकास कसबे यांचा समावेश आहे . या वेबसीरीज चे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर पोपट कांबळे व किशोर कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले.

तसेच या शुटसाठी अथक परिश्रम राजकुमार कांबळे आणि संग्राम सरवदे यांनी घेतले. यासाठी लोकेशन द अविस् विलेज रिसोर्ट कर्जत (लोणावळा) येथे वेबसीरीजचे शुटींग पार पडले. सदर हि वेबसीरीजच नेट प्राईम या ओटीटी चॅनेलवर लवकरच प्रदर्शित होईल…