करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

दुधात कॉस्टिक सोड्याच्या कथित वापरावर प्रश्नचिन्ह; चौकशी व कठोर कारवाईची गरज

करमाळा प्रतिनिधी

संकलन केलेले दूध नासू (खराब) होऊ नये त्याचे दही होऊ नये म्हणून शेतकऱ्यांपासून ते चीलिंग सेंटर पर्यंत कॉस्टिक सोड्याचा वापर केला जात असल्याचे अनेक ठिकाणी दिसून येत आहे. या कॉस्टिक सोड्यामुळे कॅन्सरचे प्रमाण वाढत असून यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

लोखंडाला लागलेला गंज काढण्यासाठी कॉस्टिक सोडा वापरला जातो. त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे संडास बाथरूम साफ करणे’ मलमूत्र गटारीच्या पाईपलाईन चोकअप काढणे स्वच्छ करणे, फरशा साफ करणे, साखर कारखान्याचे क्लिनिंग असेल अथवा मोठ्या मोठ्या मिल असतील त्या स्वच्छ साफ करणे व त्याचा गंज काढणे यासाठी कॉस्टिक सोडा बाजारात विक्रीला असतो.

जनावरांमधून दूध काढल्यानंतर किमान चार ते पाच तासात ते संकलन केंद्रात दूध पोचले पाहिजे अन्यथा ते नासण्याची आंबवण्याची प्रक्रिया सुरू होते. ही थांबवण्यासाठी शेतकरी पासून ते दूध संकलन केंद्र सिलिंग सेंटर दूध वाहतूक करणारे टँकर येथे प्रत्येक ठिकाणी कॉस्टिक सोडा दुधात टाकल्या जातो. या कॉस्टिक सोड्यामुळे दुधाचे दही झाले असेल तरी ते पुन्हा दूध होते.

विशेषतः ऑक्टोंबर महिन्यात प्रचंड उष्णता असते शेतकरी संध्याकाळी दूध काढतो व उष्णतेमुळे दूध नासण्याची प्रक्रिया चालू होते . यावेळी तर या कॉस्टिक सोड्याचे प्रमाण दुपटीने वाढले जाते. हा कॉस्टिक सोडा किराणा दुकानापासून ते मोठे मोठे केमिकल कंपन्यात अडीशे ते तीनशे रुपये किलो प्रमाणे मिळतो. हा कॉस्टिक सोडा आरोग्यासाठी प्रचंड हानिकारक असून त्यातून थेट शरीरात कॅन्सर तयार होण्याची प्रक्रिया चालू होती. यामुळे कॉस्टिक सोडा खुल्या बाजारात विकण्यास बंदी आणणे गरजेचे आहे.

शेतकऱ्यांनी रात्री काढलेले दूध अवघ्या चार ते पाच तासात दूध संकलन केंद्रात पोहोच केले तर कुठेही कॉस्टिक सोडा वापरण्याची गरज लागणार नाही. मात्र काही शेतकरी सुद्धा सकाळचे व संध्याकाळचे दूध एकत्र करून त्यात कॉस्टिक सोडा घालून दूध डेअरीला देतात. पुन्हा दुध डेअरीचा चेअरमन एकत्रित संकलित झालेले दूध चिलिंग सेंटर पर्यंत जाईपर्यंत खराब होऊ नये म्हणून कॉस्टिक सोडा टाकतो. परत पुढे चिलिंग सेंटर मध्ये टँकर भरल्यानंतर टँकर पावडर प्लांट पर्यंत जाऊ पर्यंत दूध नासू नये म्हणून त्यात पुन्हा टँकर मध्ये कॉस्टिक सोडा टाकला जातो.

दूध पावडर प्लांट पर्यंत जाईपर्यंत तीन ते चार वेळा कॉस्टिक सोडा दुधात टाकला जातो. कॅन्सरचे प्रमाण वाढवणारा कॉस्टिक सोडा दुधातून हद्दपार करण्याचे आव्हान आता दूध उद्योगापुढे उभे राहिले आहे. गाईच्या सडातून निघालेले दूध चार तासाच्या आत संकलन केंद्रात पोहोचून त्याचे थंड करण्याची प्रक्रिया पार पडली तर कॉस्टिक सोडायची गरज लागणार नाही. मात्र वाहतुकीचा खर्च वाचवण्यासाठी सकाळ व संध्याकाळचे दूध एकत्र करून दूध संघाला दूध पुरवठा करण्याची सवय मोडून काढणे गरजेचे आहे.

टीप : सदर माहिती अधिकृत कोणाच्या नावाने नसली तरी प्रकरण गंभीर आहे. सदरची माहितीला संकलन केंद्र चालवत असलेल्या उद्योजकाने दुजोरा दिला आहे.
याशिवाय आम्ही तज्ज्ञचा सल्ला घेतला असता त्यांच्या मते…
“कॉस्टिक सोड्यामुळे थेट कॅन्सर होतो” हा दावा वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेला नाही. कॉस्टिक सोडा अत्यंत संक्षारक (corrosive) असल्याने तोंड, अन्ननलिका आणि पोटाला गंभीर इजा होऊ शकते. मात्र तो थेट कॅन्सर निर्माण करतो, असे ठोस वैज्ञानिक पुरावे नाहीत.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE