करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

करमाळ्यात ‘निर्भया पथक’चे पथनाट्य; महिला व मुलींच्या सुरक्षिततेबाबत जनजागृती

करमाळाचा राजा गणेशोत्सव मंडळ व निर्भया पथकाचा संयुक्त उपक्रम

करमाळा : महिला व मुलींच्या सुरक्षिततेबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने करमाळा निर्भया पथक व करमाळाचा राजा गणेशोत्सव मंडळ, राशीन पेठ, करमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने करमाळा शहरातील विविध ठिकाणी ‘निर्भया पथक’ या विषयावर प्रभावी पथनाट्याचे आयोजन करण्यात आले.

यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, करमाळा बस स्थानक, कन्या प्रशाला, ग्लोबल सायन्स, भवानी नाका तसेच सुभाष चौक आदी ठिकाणी पथनाट्य सादर करून महिला व मुलींनी संकटाच्या प्रसंगी कोणती काळजी घ्यावी, छेडछाड व महिलांवरील अत्याचाराच्या घटना घडल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क कसा साधावा, यासाठीचे असणारे हेल्पलाइन नंबर देण्यात आले.तसेच उपलब्ध कायदेशीर मदत व सुरक्षा यंत्रणांचा वापर कसा करावा, याबाबत जनजागृती करण्यात आली.

पथनाट्याद्वारे महिला व मुलींनी भीती न बाळगता अन्यायाविरोधात आवाज उठवावा, संशयास्पद अथवा त्रासदायक प्रकारांची माहिती तत्काळ पोलिसांना द्यावी आणि सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, असा संदेश प्रभावीपणे देण्यात आला.

या कार्यक्रमास माननीय अंजना कृष्णा व्ही. एस. मॅडम,(IPS) सहाय्यक पोलीस निरीक्षक भैरवनाथ पाटील, पोलीस उपनिरीक्षक अतुल विटुकडे, पोलीस हवालदार मंगेश पवार, संभाजी पवार, गणेश गुटाळ तसेच महिला पोलीस अंमलदार विद्या इंगोले उपस्थित होते.

यावेळी राशीन पेठ तरुण मंडळाचे कार्यकर्ते तसेच विद्यार्थी, नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. पथनाट्याच्या माध्यमातून सादर करण्यात आलेल्या संदेशाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

महिला सुरक्षितता ही केवळ पोलिसांची नव्हे, तर संपूर्ण समाजाची जबाबदारी महिला व मुलींमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासोबतच समाजातील प्रत्येक घटकाने महिलांच्या सन्मान व सुरक्षिततेसाठी पुढाकार घ्यावा, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. गणेशोत्सवाच्या निमित्ताने सामाजिक जनजागृतीचा उपक्रम राबविल्याबद्दल राशीन पेठ तरुण सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांचे उपस्थितांनी कौतुक केले.

— करमाळा निर्भया पथक व करमाळाचा राजा गणेशोत्सव मंडळ, राशीन पेठ, करमाळा

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE