करमाळाताज्या घडामोडी

आमदार नारायण ( आबा ) पाटील यांचा वाढदिवसानिमित्ताने मास्क आणि आर्सेनिक अल्बम गोळ्या वाटप ; तसेच लवकरच रुग्णवाहिकाही सेवेत

करमाळा समाचार 

करमाळा तालुक्याचे शिवसेनेचे माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्यावतीने करमाळा शहरात आज 2000 मास्क 4000 अर्सेनिक गोळ्यांच्या डब्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे शहर प्रमुख प्रवीण कटारिया युवा सेनेचे तालुका अध्यक्ष सागर गायकवाड उपशहर प्रमुख पांडुरंग जाधव प्रमुख संजय शीलवंत पत्रकार नागेश चेंडगे कुंभेज शिवसेना शाखाप्रमुख मारुती भोसले उपशहर प्रमुख संजय भालेराव पंकज परदेशी शाखाप्रमुख सुरज कांबळे दशरथ कांबळे अण्णा यादव दीपक भोसले आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे म्हणाले की, खासदार डॉक्टर श्रीकांत फाउंडेशनच्यावतीने करमाळा तालुक्यात आत्तापर्यंत 2000 मास्क चे वाटप करण्यात आले. सोबतच आर्सेनिक गोळ्या घरोघरी देण्यात आलेल्या आहेत. आज शिवसेनेचे माजी आमदार नारायण पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून करमाळा शहरात आलेल्या ग्रामीण भागातील सर्व बाजार करून मास्क वाटण्यात आले आहेत. लवकरच करमाळा तालुक्यासाठी शिवसेना नेते तथा राज्याचे नगरविकास मंत्री मा ना श्री एकनाथजी शिंदे साहेब आणि डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशन यांच्या वतीने एक अद्ययावत रुग्णवाहिका करमाळा तालुक्यातील जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध करून देणार असल्याची माहिती शेवटी उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे, शहरप्रमुख प्रवीण कटारिया यांनी दिली

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE