करमाळाताज्या घडामोडीसोलापूर जिल्हासोलापूर शहर

भाजपाच्या जिल्हाध्यक्षपदी गणेश चिवटे यांची निवड

करमाळा समाचार


सोलापूर जिल्हा भाजपाच्या जिल्हाध्यक्षपदी गणेश चिवटे यांची निवड करण्यात आली आहे. पक्ष संघटना अधिक बळकट करणे, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची तयारी आणि पक्षविस्ताराच्या दृष्टीने त्यांच्या नियुक्तीकडे महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून पाहिले जात आहे.

गणेश चिवटे यांच्या निवडीचे भाजप कार्यकर्त्यांनी स्वागत करत त्यांचे अभिनंदन केले आहे. जिल्हाभरातील पक्ष संघटना अधिक सक्षम करण्यासाठी तसेच कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन पक्षाची वाटचाल अधिक गतिमान करण्याची जबाबदारी आता त्यांच्या खांद्यावर असणार आहे

यावेळी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी, “गणेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्ह्यात भाजप आणखी मजबूत होईल आणि संघटनात्मक कामाला अधिक गती मिळेल,” असा विश्वास व्यक्त केला. करमाळ्यात विविध ठिकाणी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून आणि मिठाई वाटप करून नव्या जिल्हाध्यक्षांचे स्वागत केले.

भाजपच्या या नियुक्तीमुळे जिल्ह्यातील पक्ष संघटनेला नवे नेतृत्व मिळाले असून आगामी काळात संघटन विस्तार आणि निवडणूक तयारीला अधिक वेग मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE