करमाळासोलापूर जिल्हा

तालुक्यात मोजक्या तेरा गावात रुग्ण संख्या दहाच्या वर ; तरीही तालुक्यावर निर्बधाचे संकट

करमाळा समाचार 

सोलापूर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी नुकतेच करमाळ्यासह पाच तालुक्यांना कडक निर्बंध टाकण्याबाबत सूचना दिलेले आहेत. परंतु करमाळा तालुक्यातली २२३ पैकी मोजक्या वाड्या-वस्त्या सोडल्या तर रुग्ण संख्या अगदी नगण्य आहे. तर मग त्या मोजक्या गावासाठी संपूर्ण तालुक्याला बंदीचा आदेश काढणे अन्यायकारक ठरत आहे असे व्यापारी म्हणत आहेत. संबंधित गावात योग्य उपाययोजना राबवल्यास कोरोना प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल. परंतु संपूर्ण तालुक्याला वेठीस धरणे चुकीचे होत आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर विरोध पाहायला मिळत आहे.

करमाळा तालुक्यामध्ये मागील दोन वर्षांपासून लॉकडॉऊनला व संचार बंदीला व्यापारी व सामान्य माणूस पुरता कंटाळलेला आहे. कसाबसा पुन्हा एकदा सावरण्याचा प्रयत्न करत असताना ठराविक कालावधीनंतर पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढीचा तोटा संपूर्ण तालुक्याला सहन करावा लागणार आहे. तर मोठ्या व्यापाऱ्यांसह छोट्या व्यापाऱ्यांचे ही अडचणीत मोठा मोठी वाढ होताना दिसत आहे. स्थानिक पातळीवर केलेले बंद व संपूर्ण राज्यात केलेल्या बंद यामुळे कर्जाचे हप्ते, दुकान भाडे, घर, प्रपंच यासाठी लागणारा खर्च व प्रत्येक दुकानदाराला आपल्या कर्मचाऱ्यांचा पगार अशा प्रकारचे गरजा पूर्ण कराव्या लागत आहेत. अशा परिस्थितीत वारंवार बंद मुळे परिस्थिती पुर्ण हाता बाहेर जाताना दिसत आहे. त्यामुळे संपूर्ण तालुक्याला बंद करण्यापेक्षा ज्या गावात रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्या भागात संचारबंदी लागू करणे योग्य ठरेल.

तालुक्यातील २२३ वाड्या-वस्त्यांवर एकूण ४०५ रुग्ण सध्या दिसून येत आहेत. तर त्यापैकी १३ गावांमध्ये तब्बल १६४ रुग्ण आढळून आलेले आहेत. तरी इतर गावांमध्ये चार – पाच या प्रमाणात रुग्ण आहेत. तर काही गावांमध्ये एक किंवा दोन असे ॲक्टीव रुग्ण आहेत. तब्बल ८१ गावे सध्या कोणाच्या कचाट्यात असली तरी त्या ठिकाणी रुग्ण वाढीचे प्रमाण अपेक्षेपेक्षा खूपच कमी आहे. आजही १४२ गावांसह वाडी-वस्तीवर एकही रुग्ण आढळून आलेला नाही. लसीकरणाची मोहीम वेगात वाढवण्याची सोडून बंद करणे हा सध्या तरी योग्य पर्याय वाटत नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांकडुनही कडक निर्बधाला विरोध होताना दिसत आहे.

तेरा गावात १६४ रुग्ण ; तालुक्यात ४०५ –
जिंती २२, देवळाली १८, करमाळा १४, उमरड १४, जेऊर १३, पाडळी १२, गोरेगाव ११, उत्तर वडगाव ११, वांगी क्रमांक दोन ११, साडे १०, वांगी नंबर १०, हिंगणी ९, झरे ९ असे १३ गावात १६४ रुग्ण आहेत. त्यामुळे यागावांवर रुग्ण संख्या जास्त असेल अशा भागात विशेष लक्ष दिले किंवा संबंधित रुग्णांना अलगीकरण केले तर इतरांना त्रास सहन करावा लागणार नाही.

The number of patients in thirteen villages in the taluka is above ten; Still the crisis of unrest in the taluka

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE