करमाळासोलापूर जिल्हा

मकाई कारखान्याची निवडणुक जाहीर ; जागा व निवडणुक तारखांची घोषणा

करमाळा समाचार

मकाई सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली असून उद्यापासून याचे नामनिर्देशन पत्र भरण्याची काम सुरू होणार आहे. मकाई सहकारी साखर कारखान्याच्या 17 जागांसाठी सदर निवडणूक जाहीर करण्यात आले आहे. बऱ्याच दिवसांपासून सदर निवडणूक बाबत अनेकांना उत्सुकता लागून राहिली होती. मागील मागील वेळी झालेल्या निवडणुकीत बागल गटांनी एकतर्फी विजय संपादित करीत सत्ता मिळवली होती. यंदा दत्तकला शिक्षण संस्थेचे प्रा. रामदास झोळ हे स्वतंत्र पॅनल उभा करणार असल्याची माहिती असल्याने सदर निवडणुकीत चुरस निर्माण होईल अशी शक्यता आहे.

आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावर प्रशासक आल्यानंतर मकाई कारखान्याच्या निवडणुकीबाबत तर्कवितर्क वर्तवले जात होते. परंतु आता निवडणूक जाहीर झाले असून निवडणूक निर्णय अधिकारी सोपान टोंपे यांनी जाहीर केले आहे.

पाच गटातून 11 तर इतर पाच गटातून सहा जागांची ही निवडणूक होणार आहे. त्यामध्ये ऊस उत्पादक गट भिलारवाडी दोन जागा, पारेवाडी गट तीन, जागा चिखलठाण गट दोन जागा, वांगी गट दोन जागा, मांगी दोन जागा तर राखीव मतदारसंघांमध्ये बिगर उत्पादक सहकारी व पणन संस्था यामध्ये एक जागा, महिला राखीव मध्ये दोन जागा, अनुसूचित जातीमध्ये एक जागा, मागासवर्गीय मध्ये एक जागा, भटक्या विमुक्त जातीमध्ये एक जागा असे एकूण 17 जागांवर निवडणूक होणार आहे.

नामनिर्देशन पत्र भरण्याची तारीख 12 मे ते 18 मे दरम्यान अकरा ते तीन वाजेपर्यंत तहसिल कार्यालय येथे आहे. तर मतदान 16 जुन 2023 रोजी होणार आहे. मतमोजणी 18 जुन तारखेला होईल तर लगेचच त्याच दिवशी निकाल घोषित करण्यात येणार आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE