दारु प्यायला पैसे दिले नाही म्हणुन मित्राच्या कपाळावर साधला निशाणा
करमाळा समाचार
दारु प्यायला उसणे १०० रुपये दिले नाही म्हणून डोक्यात दगड मारुन जखमी केल्याप्रकरणी चिखलठाण ता. करमाळा येथील किरण बुडन पवार याच्यावर करमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युवराज ताराचंद पवार 24 वर्षे धंदा-मजुरी रा.चिखलठाण नं 1 ता.करमाळा जि.सोलापुर याने फिर्याद दिली आहे.

युवराह हा चिखलठाण नंबर 1 ता.करमाळा येथील चिंचेच्या झाडाखाली उभा असताना तेथे किरण बुडन पवार हा आला व म्हणाला की,मला दारू प्यायची आहे मला 100/- रू उसणे दे, त्यावेळी मी त्यास माझे कडे पैसे नाहीत असे म्हणालो असता किरण पवार याने मला शिवीगाळी करत हाताने, लाथाबुक्क्याने मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यावेळी किरण पवार यास मला मारहाण करू नको माझे कडे सध्या तुला उसणे दयायला पैसे नाहीत असे म्हणालो असता त्याने चिडुन तेथेच पडलेला दगड उचलुन युवराजच्या कपाळावर डावे बाजुला मारून मला जखमी केले .व शिवीगाळी करत तुला बघतोच अशी धमकी देत तेथुन निघुन गेला.
