करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

बारामती ॲग्रो चा ऊस दर जाहीर, शेतकऱ्यांमधून समाधान

करमाळा समाचार – संजय साखरे


शेटफळगडे ता. इंदापूर येथील बारामती अग्रो साखर कारखान्याने सन 2025 -26 च्या गाळप हंगामाचा पहिला हप्ता 3100 रुपये जाहीर केला आहे. बारामती अग्रो साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुभाष आबा गुळवे यांनी ही घोषणा केली. आज कात्रज तालुका करमाळा येथे माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्या विकास निधीतून विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा मा.आमदार संजय मामा शिंदे यांचे शुभहस्ते व सुभाष गुळवे यांच्या उपस्थितीत पार पडला.त्यादरम्यान उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांनी ही घोषणा केली.

बारामती अग्रो साखर कारखान्याने आज अखेर दहा लाख मे. टन गाळप पूर्ण केले असून करमाळा तालुक्यात बारामती अग्रोची सात विभागीय कार्यालय आहेत. यापैकी केतुर 70 हजार मे टन, टाकळी एक लाख वीस हजार मेटन,करमाळा एक लाख मेट्रिक टन, चिकलठाण 60000 मे. टन,उमरड 40000 मे. टन व कंदर येथून चाळीस हजार मे. टन ऊस पुरवठा कारखान्याला करण्यात आलेला आहे.

बारामती अग्रो साखर कारखान्याने करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विकास साला मोठ्या प्रमाणावर हातभार लावला असून कारखान्याने शेतकऱ्यांना रासायनिक खतांचा पुरवठा केलेला आहे असे गुळवे यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी बारामती अग्रो साखर कारखान्यांना ऊस पुरवठा करून सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले. बारामती ऍग्रो साखर कारखान्याने पहिला हप्ता 3100 जाहीर केल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE