गुणवंत विद्यार्थिनींचा सन्मान सोहळा संपन्न ; तेजस्विनी संतोष मंडलिक यांचा विशेष सत्कार
करमाळा दि. २५

मुक्ता साळवे शैक्षणिक अभियान, करमाळा व करमाळा तालुक्यातील सकल मातंग समाज यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत विद्यार्थिनींच्या सन्मानाचा विशेष कार्यक्रम आज, शनिवार दि. २५ रोजी दुपारी १.०० वाजता जिल्हा परिषद विश्रामगृह, करमाळा येथे आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमात कु. तेजस्विनी संतोष मंडलिक यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या २२ व्या दीक्षांत समारंभात बी.ए. (इंग्रजी) विषयात विद्यापीठात प्रथम क्रमांक प्राप्त करून सुवर्णपदक मिळवून करमाळा तालुक्याचा गौरव वाढविला आहे.
तसेच कु. अमृता भाऊसाहेब (उर्फ बबन) आरणे हिने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातून बी.ए. (मराठी) परीक्षेत मार्च २०२५ मध्ये A+ श्रेणी प्राप्त केली असून, एम.ए. भाग-१ (मार्च २०२६) परीक्षेत चांगले गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. सध्या त्या बार्शी येथील शिवाजी महाविद्यालयात उच्च शिक्षण घेत असून, पदवीनंतर पुढील शिक्षणाची वाटचाल करणाऱ्या समाजातील गुणवंत विद्यार्थिनी म्हणून त्यांचाही या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला आहे.

या सन्मान सोहळ्यास माजी नायब तहसीलदार बाबासाहेब (दादा) गायकवाड, डॉ. ज्ञानदेव केमकर, डॉ. अजय तोरड, भीष्माचार्य चांदणे सर, नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आलाट, सामाजिक कार्यकर्ते देवनभाऊ आलाट, सामाजिक कार्यकर्ते नामदेव गायकवाड, भैरवनाथ अडसूळ (सालसे), रामदास कांबळे (रावगाव), ग्रामपंचायत सदस्य दादासाहेब पवार (रावगाव), मातंग एकता आंदोलनाचे तालुका अध्यक्ष शरद पवार (करमाळा), सौ. उमा संतोष मंडलिक, बाबा करंडे, अभिजित मंडलिक, कपिल मंडलिक, रोहिदास आलाट, गणेश आलाट, अभिषेक मंडलिक, योगेश मंडलिक, विश्वदत्त मंडलिक, चेतन आलाट, शुभम करंडे, भास्कर पवार, बबन आरणे, सौ कविता आरणे, संग्राम आरणे, लकी आरणे आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमास करमाळा तालुका व परिसरातील मातंग समाजबांधव, पालक, विद्यार्थी, शिक्षणप्रेमी व पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती, गुणवंत विद्यार्थिनींना भारताचे संविधान तसेच लोकशाहीर साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांचे पुस्तक व आपण स्पर्धा जिंकत आहोत हे पुस्तक, पेन, बुके, फेटा, शाल देऊन दोन्हीही विद्यार्थिनींचा सन्मान मुक्ता साळवे शैक्षणिक अभियान, करमाळा व करमाळा तालुक्यातील सकल मातंग समाज यांच्या वतीने करण्यात आले आहे.
स्पर्धा परीक्षा व उच्च शिक्षणासाठी माजी नायब तहसीलदार बाबासाहेब उर्फ दादा गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले तसेच भीष्माचार्य चांदणे सर यांनी उपस्थित पालक व विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले, डॉक्टर ज्ञानदेव केमकर व डॉक्टर अजय तोरड यांनी उपस्थित विद्यार्थी, विद्यार्थ्यांना व पालकांना एमपीएससी व यूपीएससी उच्च शिक्षणसंदर्भीय मार्गदर्शन केले.
त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते नामदेवराव गायकवाड यांनी माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मुक्ता साळवे शैक्षणिक अभियानचे मार्गदर्शक बाबासाहेब (उर्फ दादा) गायकवाड डॉक्टर ज्ञानदेव केमकर, भीष्माचार्य चांदणे सर, डॉक्टर अजय तोरड यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भास्कर पवार यांनी केले आभार मातंग एकता आंदोलन करमाळा तालुका अध्यक्ष शरद पवार यांनी आभार मानले.


