करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

विधानपरिषदेनंतर तालुक्याला पहिले गिफ्ट! साडेआठ कोटींचा निधी; श्रेयवाद मात्र उफाळला

करमाळा


तालुक्याला पालक मंत्र्याकडून विधानपरिषदे नंतरचे पहिले गिफ्ट! मतदार संघातील रस्ते दुरुस्ती साठी आठ कोटी पन्नास लाख रुपये मंजुर झाले असुन सदर कामाच्या निवीदा प्रक्रिया सुरू झाली असल्याने लवकरच ही सगळी कामे सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले. तर आलेल्या निधीवर आतापर्यंत आमदार नारायण आबा पाटील व भाजपा युवा नेते, मकाईचे माजी चेअरमन मा. दिग्विजय बागल
यांनी दावा केला आहे.

करमाळा तालुक्यातील अनेक रस्ते नादुरुस्त असल्याने नागरिकांची गैरसोय होत होती. यासाठी विशेष बाब म्हणून आपण सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचेकडे निधीची मागणी केली होती. यावर पालकमंत्री महोदयांनी तात्काळ साडे आठ कोटी रुपये मंजुर केल्याने आता खालील कामे मार्गी लावली आहेत.

सदरचा निधीवर दोन्ही गटाने दावा केल्यामुळे नेमका हा निधी कोणी मंजूर केला हा प्रश्न अनुत्तरीत असल्याने जोपर्यंत स्वतः पालकमंत्री या संदर्भात स्पष्टीकरण देत नाहीत तोपर्यंत हे समजू शकणार नाही. पण तालुक्याला साडेआठ कोटी मिळाल्याने रखडलेली कामे मार्गी लागतील हे निश्चित आहे. या संदर्भात आमदार नारायण पाटील व भाजपाचे नेते दिग्विजय बागल दोघांनीही दावे केल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.

मंजूर कामे व निधी :-
१) मांगी-पोथरे-निलज सा.क्र.०/०० ते ७/०० ता. करमाळा ग्राम-२७ (रक्कम ५० लक्ष) २) पाथुर्डी ते वरकुटे रस्ता सा.क्र.०/०० ते १/०० ता. करमाळा ग्रामा-२९६ (रक्कम ५० लक्ष) ३) वीट ते चोपडे वस्ती सा.क्र.०/०० ते ४/०० ता. करमाळा ग्राम-२३० (रक्कम ५० लक्ष) ४)आवाटी-नेरले-मुंगशी ते रोपळे रस्ता सा.क्र.०/०० ते ६/०० ता. करमाळा इजिमा १० (रक्कम ५० लक्ष) ५) वरकुटे ते साडे रस्ता सा.क्र ०/०० ते ४/०० ता. करमाळा ग्रामा-९३ (रक्कम ५० लक्ष) ६) केडगाव ते शेटफळ सा.क्र.०/०० ते ४/५०० ता. करमाळा ग्राम ६४ (रक्कम ५० लक्ष) ७) झरे-घाडगे वस्ती ते प्र-१२६ सा.क्र.०/००ते २/०० ता. करमाळा ग्राम-१४५ (रक्कम ५० लक्ष) ८)केडगाव-कुष्ठरोग कॉलनी रस्ता सा.क्र.०/०० ते २/५०० ता. करमाळा ग्रामा-१४९ (रक्कम ५० लक्ष) ९)बोरगाव ते निलज सा.क्र.०/०० ते २/०० ता.करमाळा ग्राम-८१ (रक्कम ५० लक्ष) १०) सौंदे-फिसरे सा.क्र.०/०० ते ३/५०० ता. करमाळा ग्राम-३९ (रक्कम ५० लक्ष) ११)कुगाव ते कोकरे वस्ती सा.क्र.०/०० ते १/५०० ता. करमाळा ग्राम १२९ (रक्कम ५० लक्ष) १२)प्ररामा ८ भाळवणी ते केम रस्ता सा.क्र.०/०० ते १२/०० ता. करमाळा इजिमा ७७ (रक्कम ५० लक्ष) १३) सांगवी ते प्ररामा ८ प्रजिमा १२ ते सातोली रस्ता सा.क्र.०/०० ४/०० ता. करमाळा इजिमा-१११ (रक्कम ५० लक्ष) १४) गोयेगाव ते जोडरस्ता सा.क्र.०/०० ते ३/०० ता.करमाळा ग्राम-७५ (रक्कम ५० लक्ष) १५) खातगाव ३ जोडरस्ता सा.क्र.०/००ते २/०० ५०,०० ता. करमाळा ग्रामा १०७ (रक्कम ५० लक्ष) १६) कामोणे ते रामा १४३ सा.क्र.०/०० ते २/५०० ता. करमाळा ग्रामा (रक्कम ५० लक्ष) १७) निंभोरे ते साडे रस्ता सा.क्र.०/० ५/०० ता. करमाळा ग्रामा ५८ (रक्कम ५० लक्ष) अशा प्रकारे एकुण सतरा रस्त्यांसाठी साडे आठ कोठी रुपये मंजुर झाले असून सहा महिन्यांत कामे पुर्ण होणार असल्याचे आमदार नारायण आबा पाटील यांनी सांगितले. तसेच दिग्विजय बागल यांनीही जेष्ठ नेत्यांसह पालकमंत्री यांचे आभार मानले आहेत.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE