करमाळाक्राईमसोलापूर जिल्हा

नऊ महिण्यापासुन मोकाट आरोपींना अटक न झाल्यास तीव्र निदर्शने ; दुजाभाव केल्याचा आरोप

करमाळा समाचार 


करमाळा-वांगी नं 1 येथील शेतजमिनीचा वाद प्रशासन दरबारी चालू असून महादेव कांबळे हे गेल्या 149 दिवसापासून करमाळा तहसील येथे चक्री उपोषणास बसलेले असून दि 08/07/21 रोजी वांगी येथील दलित तरूणांवर सदरिल विवादित जमिनीतून ऊस तोडून नेणे ,ड्रिप पाईपलाईन तोडून नेणे असे गून्हे दाखल झाले असता दोन तासांच्या आत दलित तरूणांना अटक करण्यात आली.

परंतू 24/10/20 व 19/11/20 रोजी अनुसूचित जाती आणि जमाती प्रतिबंधात्मक कायद्यानूसार दाखल असलेल्या अदखलपात्र गून्ह्यातील आरोपी हे मोकाट फिरत असून सदरिल आरोपींना सेशन कोर्ट आणि हायकोर्टाने जामिन फेटाळलेला आहे. गून्हा दाखल होऊन नऊ महिने होत आले. तरी पोलीस प्रशासन आरोपींना अटक का करत नाही. याबद्दल संशय निर्माण होत आहे म्हणून येत्या 48 तासांत आरोपींना अटक न झाल्यास शनिवार दि 10/07/21 रोजी दुपारी 12-30 वा तीव्र निदर्शने करण्यात येणार असल्याचे रिपाई (आ)चे प महाराष्ट्रात उपाध्यक्ष नागेशजी कांबळे यांनी मा उपविभागीय पोलीस अधिकारी यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे.

सदरिल निवेदनाच्या प्रती मा जिल्हाधिकारी, मा तहसीलदार, मा पोलीस निरीक्षक करमाळा यांना देखील पाठवलेल्या आहेत

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE