करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

करमाळ्यात भाजपा(कमळ) – राष्ट्रवादी (घड्याळ) युती ; तारक की मारक ?

करमाळा समाचार विशाल घोलप 

करमाळा तालुक्यातील राजकारणात पुन्हा एक नव्या अध्यायाला सुरुवात झाली आहे. या ठिकाणी पक्षीय राजकारणातून जरी एकत्र आलेले दिसत असले तरी स्थानिक पातळीवर परस्पर विरोधक हे एकाच ठिकाणी आल्याने त्यांची युती ही तारक ठरणार किंवा मारक हा येणारा काळ ठरवेल. यापूर्वीही अशाच पद्धतीच्या युती आघाड्या पाहायला मिळालेल्या होत्या त्याचा फटका संबंधित पक्षांना बसलेला दिसून आला आहे यावेळी ची कृती ही देखील पक्षामुळे झालेली दिसून येत असल्याने गटातील पदाधिकाऱ्यांची भूमिका ही अद्याप गुलदस्तात आहे.

करमाळा तालुक्यात भाजपचे नेतृत्व करत असणाऱ्या बागल गटाला नगरपरिषद निवडणुका असतील किंवा आता होत असलेल्या झेडपी निवडणुकांमध्ये स्वतःची बाजू मांडण्याचा अधिकार राहिलेला दिसून येत नाही. वरिष्ठांच्या आदेशाने बागल गट सध्या काम करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बागल समर्थकांना यंदा संधी मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु युती झाल्याने त्यातही तीनच जागांवर समाधान मानावे लागणार आहे. त्यामध्ये पुन्हा भाजपाचे किती चेहरे व बागल गटाचे किती चेहरे दिसणार हा मोठा प्रश्न आहे.

तर संजयमामा शिंदे यांनी स्वतंत्र लढण्याची जाहीर करून आता वरिष्ठ पातळीवरून आलेल्या आदेशाप्रमाणे भाजपासोबत युती केली आहे. वास्तविक पाहता महानगरपालिका व महाराष्ट्रात इतर ठिकाणी जरी भाजपाचे पारडे जड असले तरी सोलापूर जिल्ह्यात ग्रामीण भागातून विशेष म्हणजे माढा लोकसभा मतदारसंघात अपेक्षित असे यश हे भाजपाला आलेले दिसून येत नाही. त्यामुळे माजी संजयमामा शिंदे यांनी घेतलेली ही भूमिका त्यांच्या गटासह पक्षाला कितपत योग्य असेल हे सांगणे थोडेसे गाईचे ठरू शकते.

जसजसे आता उमेदवार ठरत जातील तस तसा उद्रेक बाहेर येण्याची शक्यता आहे. दोन्हीही मोठे गट असून तुल्यबळ असे गट आहेत. कोणत्या भागातील कोणती जागा कोणाला ? बागल गटाला की भाजपाला ? याशिवाय शिंदेनाही कट्टर समर्थक उमेदवारांना थांबवावे हा प्रश्न राहणार आहे. तरीही याबाबत त्याना मन घट्ट करुन आदेश द्यावे लागणार आहेत. त्यामुळे दोन्हीही गटांनी ऐनवेळी केलेली युती ही तारक ठरेल की मारक असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE