केत्तुर भागातुन मामांचा खंदा समर्थक मैदानात उतरण्याच्या तयारीत ; परिसरातुन वाढता प्रतिसाद
करमाळा समाचार

करमाळा तालुक्याचे पश्चिम भागातील सर्वसमावेशक असलेले युवा नेतृत्व ॲड. अजिनाथ विघ्ने पंचायत समिती केत्तुर गणातुन इच्छुक असुन त्यांनी होम टु होम मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केलेली आहे. सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेस(अजितदादा पवार) पक्षाचे प्रवक्तेपदी असुन माजी आमदार. संजयमामा शिंदे यांचे पश्चिम भागातील एक अभ्यासु व विश्वासु सहकारी आहेत. वयाच्या १८ व्या वर्षापासुन शिवसेना पक्षाच्या माध्यमातुन त्यांनी राजकारणाला सुरुवात केली. राजकारणापेक्षाही समाजकार्यात त्यांनी स्वतःचा वेगळा ठसा उमटवत, केत्तुरचे उपसरपंच,सरपंच म्हणुन कार्य केले आहे.

सर्वसामान्यांच्या हक्काला धावुन जाणारा आणि विकासकामात कायम अग्रेसर राहुन कार्यरत असणाऱ्या ॲड.अजित विघ्ने यांनी पुढे माजी मंत्री स्व. दिगंबरमामा बागल, माजी आमदार. जयवंतराव जगताप, आमदार. नारायण आबा पाटील यांचे सोबत राहुनही आपले राजकीय सामाजिक कार्य केलेले आहे. सर्वसामान्यांचे जिव्हाळ्याचे प्रश्न सोडविण्यावर त्यांचा कायमच ठसा राहीला आहे.
उत्कृष्ट वक्ते असणाऱ्या ॲड. अजित विघ्ने यांचे युवक संघटन कौशल्य वाखाणण्यासारखे असुन ते एक अभ्यासु युवक नेते आहेत. संजय गांधी निराधार योजनेवर अशासकीय सदस्य तसेच अनेक कमिट्यावर त्यांनी काम केलेले असुन सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदु मानुन ते सतत कार्यरत आहेत. २०१२ साली पंचायत समिती निवडणुकीत त्यांचा अल्पमतांनी पराभव झाला तरी ते आजपर्यंत कधीही खचले नाहीत किंवा डगमगले नाहीत, ऊलट डबल उमेदीने सर्वसामान्यांची कामे त्यांनी केलेली आहेत.

रेल्वे थांब्यासाठी व विकासकामांसाठी त्यांनी केलेला संघर्ष सर्वांनाच माहीत आहे. गावात राष्ट्रीयकृत बँक असु दया किंवा रस्त्याचे, पुलाचे, पाण्याचे, वीजेचे प्रश्न असु दया ते सोडविताना त्यांनी कायम महत्वपूर्ण भुमिका बजावलेल्या आहेत. आज केत्तुर पंचायत समिती गणातुन सर्वसाधारण जागेवरून ते पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानात उतरले असुन,भागातील प्रत्येक गावातुन त्यांचे नेतृत्वाला प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे. त्यांचे गावोगावी जनसंपर्क अभियान चालु असुन पश्चिम भागातुन ते यावेळी नक्कीच पंचायत समिती निवडणुक जिंकुन येतील याबाबत चर्चा घडत आहेत. एक चांगला, होतकरू, सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी कायम झटणाऱ्या या नेतृत्वाच्या पाठीशी जनाधार असलेचे बोलले जात आहे.

