बिबट्याला पकडण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना दिसले करमाळकरांचे खरे रुप ; शेटफळ युवकांचे कौतुकास्पद कृत्य
करमाळा समाचार
कसलही पुर्व तयारी नसताना तरूणांनी एकत्र येऊन अचानक एका तासात केली दिडशे लोकांच्या जेवनाची व्यवस्था केली. मागील काही दिवसात बिबट्याच्या हल्ल्यात तीन बळी गेलेतरी वनविभाग काय करतेय असा प्रश्न विचारणाऱ्या करमाळकरांचे दुसरे रुपही वनविभाग व बाहेरुन आलेल्या कर्मचाऱ्यांना दिसुन आले. दिवसभर त्यांच्यासोबत ताटकळत असणाऱे गावकऱ्यांनी त्यांना सहकार्य तर केलेच उलट रात्री अचानक जेवणाची सोय नसल्याचे लक्षात आल्यानंतर काही वेळातच दिडशे लोकांचे जेवण तयार करुन खाऊ घातले.

बिबट्याला पकडण्यासाठी दिवसरात्र प्रयत्न करणारे वनविभाग व पोलीस विभागातील साधारण दोनशे कर्मचारी आधिकरी गेली दोन दिवस शेटफळ आणी परिसरातील तळ ठोकून आहेत. सायंकाळी साडेसात वाजता गावातील तरूणांनी एका कर्मचाऱ्याला आता तुमची संध्याकाळची जेवणाची काय व्यवस्था हे विचारले .यावेळी त्यांनी सांगितले की तशी काहीच व्यवस्था केलेली नाही. बघू एखाद्या हाँटेलात करावी लागेल .

गावात तर हाँटेल नाही आपल्यासाठी जीव धोक्यात घालून सेवा देणारी मंडळी आपल्या गावात उपाशी अर्धपोटी राहवी ही कल्पना त्यांना बरोबर वाटली नाही. त्यांनी या सर्व लोकांच्या जेवणाची व्यवस्था करायचे ठरवले. आपसात वर्गणी काढून भाजी व भातासाठी आवश्यक सामान खरेदी केले एकाने गँस एकाने शेगडी घेऊन आले प्राथमिक शाळेत आठ वाजता स्वयंपाक सुरू केला स्वयंपाक करण्याची माहीती अनुभव नसतानाही एका तासात स्वयंपाक तयार केला.
सोशल मिडीयावरून अवाहन केले गावातील लोकांनी आर्ध्या तासात चारशे भाकरी चपाती जमा केली व सर्वांना नऊ वाजता जेवण वाढण्यास सुरवात केली. कोणाचे नेतृत्व नाही कोण प्रमुख नाही सर्वांनी आप आपली जबाबदारी ओळखून टिमवर्क दाखवले खरोखरच या सर्व युवक व तरूणांचा आभिमान वाटला.