करमाळासोलापूर जिल्हा

दुजाभाव – सामान्य भक्तांना दर्शनापासुन टाळले ; राजकीय व सामाजीक कार्यकर्त्यांची भक्ती श्रेष्ठ

करमाळा समाचार 

लग्नानंतर दामप्त्याला महत्वाचे असलेले देवाचे दर्शनालाही परवानगी न देणारे करमाळ्यातील देवस्थान मंदीर समीतीच्या काही सदस्यांच्या मनमानीमुळे सामाजीक कार्यकर्ते व राजकीय पुढाऱ्यांना मात्र प्रवेश दिला जात आहे. सामान्य लोकांची भक्ती कमी पडतेय काय अशीही भावना व्यक्त होऊ लागल्या आहेत. दिल्या तर सर्वांनाच प्रवेश द्यावा अशी भावना सामान्य भक्ताकडुन व्यक्त केली जात आहे. तर काही मस्जिद मध्येही गर्दी वाढु लागल्याचे चित्र आहे. मंदीर मस्स्जिद मध्ये एका ठिकाणी वशीलेबाजी तर दुसरीकडे खुली सुट हे कोरोना पार्श्वभूमीवर चुकीचे आहे.

लॉकडाउन जाहीर केल्यानंतर देशात तसेच महाराष्ट्रात सर्वच मंदिरे व मस्जिद अशी सर्वच प्रार्थनास्थळे बंद ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. तर काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत मंदिरातील पूजा व मस्जीद मधील नमाज पठण करण्यास परवानगी दिली होती. पण काही राजकीय पुढारी व सामाजिक कार्यकर्त्यांना ही मंदिरे कधी बंदच झाली नव्हती असे चित्र दिसून येत आहे. यंदा नवरात्रीत घटस्थापना करण्यात आली. ती करत असताना भाविकांना आत प्रवेश दिला गेला नाही. तर ज्योत घेऊन येणाऱ्या गावोगावच्या भक्तांनाही आत प्रवेश करुन दिलेला नाही.

पण मागील काळात अनेकदा राजकीय पुढारी व सामाजिक कार्यकर्त्यांना मात्र आज प्रवेश देऊन दर्शन तर काहींनी तर राजकीय भूमिका ही मांडल्या आहेत. म्हणजेच यामध्ये दुजाभाव होताना दिसून येत आहे. राजकीय पुढारी व सामाजिक कार्यकर्त्यांना जर मंदिरे खुली होत असतील तर सामान्यांनी अशी कोणती भक्ती कमी पडली की त्यांना प्रवेश दिला जात नाही. एक तर प्रवेश सर्वांसाठी खुला असावा अन्यथा पुजारी व्यतिरिक्त कोणीही जाऊ नये यासाठी कडक नियम लागणे गरजेचे आहे. मागील काळात प्रशासनाच्या परवानगीशिवाय आत प्रवेश कोणी दिला. त्यांचीही चौकशी करावी त्यानंतरच अशा चुकीच्या प्रथांवर आळा बसु शकेल असे मत नागरिक व्यक्त करीत आहेत.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE