करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

उजनी काठचे शेतकरी आक्रमक ; वीज व पाण्यासाठी आमच्यावर अन्याय – योग्य पद्धतीने उत्तर देणार

करमाळा :


उजनीकाठच्या शेतकऱ्यांना आठ तास वीजपुरवठा करावा, या प्रमुख मागणीसाठी चिखलठाण येथील शेतकऱ्यांनी आजपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. मागणी मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला आहे.

आंदोलनाची माहिती मिळताच महावितरणचे अधिकारी उपोषणस्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलक शेतकऱ्यांशी चर्चा करून उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र, जोपर्यंत आठ तास वीजपुरवठ्याबाबत ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याच्या भूमिकेवर शेतकरी ठाम असल्याने चर्चेला अद्याप यश आलेले नाही.

उजनी धरणातील जलसाठा मोठ्या प्रमाणात वाढूनही उजनीकाठच्या शेतकऱ्यांना पूर्ववत आठ तास वीजपुरवठा करण्यात आलेला नसल्याने परिसरात तीव्र नाराजी आहे. त्यामुळे या आंदोलनाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले असून प्रशासन यावर काय निर्णय घेते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

ad

उजनी जलाशयाच्या प्रकल्पाला जमिनी दिल्यापासून परिसरातील शेतकऱ्यांचे पुनर्वसनाबाबत जवळपास 19 मागण्यांचं अद्यापही नियोजन करण्यात आलेलं नाही. त्यामुळे पुनर्वसन भागातील शेतकरी हा लढा पुढेही तसंच सुरू ठेवणार असल्याचे यावेळी आंदोलनकार्याच्या वतीने सांगण्यात आले. यावेळी परिसरातील पाच ते सहा गाव एकत्र आल्याचे दिसले तर येणाऱ्या काळात उजनी काठच्या सर्व शेतकऱ्यांना एकत्र घेऊन लढा देऊ असे सांगण्यात आले आहे.

यावेळी रेवन मोरे, चंद्रकांत सरडे, विठ्ठल गुंड, रावसाहेब नेमाने, हनुमंत नाईकनवरे, सुनिल सरडे, मंगेश बोद्रे, सागर पोरे, बापु राऊत, विकास गलांडे, महादेव पोरे, अजिनाथ राऊत, विलास झोळ, संदीपान सरडे, नागनाथ सरडे, राजाभाऊ गव्हाणे, नाना खवले, मारुती सरडे आदिसह शेतकरी उपस्थित होते.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE