करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

करमाळ्यात उद्या शिवसेना नेते माजी आमदार जगताप यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकर्ता मेळावा

करमाळा समाचार

करमाळा नगरपरिषद निवडणुका नंतर पुन्हा एकदा जगताप गट सक्रिय होत मैदानात उतरण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. या निमित्ताने निवडणुकांनंतर व जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पार्श्वभूमीवर जगताप गटाचा मेळावा 5 जानेवारी रोजी आयोजित केला असून यावेळी उपस्थित राहण्याचा आवाहन जगताप गटाकडून करण्यात आले आहे.

करमाळा नगरपरिषद निवडणुकीमध्ये मागील तीस वर्षापासून असलेली सत्ता यंदाच्या निवडणुकीत जरी पराभूत व्हावे लागले असले तरी खचून न जाता जगताप गटात पुन्हा एकदा नवचैतन्य निर्माण करण्यासाठी हा मेळावा महत्वाचा मानला जात आहे. यंदा पुन्हा एकदा जगताप गट मैदानात पूर्ण ताकतीने उतरण्याची तयारी करत असल्याचे दिसून येत आहे. नुकताच आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना तसेच जगताप गटाच्या समर्थकांना एकत्रित भव्य मिळावा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

त्यानिमित्ताने आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विचारविनिमय करण्यासाठी सदरच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याचे माहिती देण्यात आली आहे. सदरच्या मेळाव्यात माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या अध्यक्षतेखाली सदरची विचार विनिमय बैठक व मेळावा संपन्न होणार आहे. 5 जानेवारी रोजी दुपारी एक वाजता सदरचा मेळावा हा यशोदीप मंगल कार्यालय करमाळा निलज रोड या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. यावेळी संपर्क साधण्यासाठी 70 58 23 93 94 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE