करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

करमाळ्यातील पेंट च्या दुकानावर छापा ; करमाळा पोलिसांची कारवाई

करमाळा समाचार

करमाळा शहरात फुलसुंदर चौक परिसर येथे एका पेंटच्या दुकानात अवैधरित्या एशियन पेंट सह इतर कंपन्यांचा नावाने डुबलीकेट कलर विकत असल्याच्या कारणावरून एकावर कारवाई करण्यात आली आहे. सदरची कारवाई करमाळा पोलीस व संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आली. यावेळी मुद्देमाल घेऊन करमाळा पोलीस ठाण्याच्या दिशेने गेले आहेत. त्यावर कारवाई करण्याचे काम सुरू आहे.

करमाळा पोलीस ठाण्याची पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांना मिळालेल्या माहितीनुसार एका पेंटच्या दुकानात डुबलीकेट कलर विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्या ठिकाणी जाऊन पाहणी केल्यानंतर वेगवेगळ्या कंपनीच्या डुबलीकेट कलर मिळून आला आहे. त्यावरून संबंधित दुकानदारासह मुद्देमाल ताब्यात घेतला असून संबंधित संशयित दुकानदारावर कारवाई करण्याचे सुरू आहे. यावेळी कंपनीच्या अधिकाऱ्यांसह पोलीस निरीक्षक गुंजवटे यांचे पथकात ढवळे, काझी, रणदिवे व गणेश शिंदे आदि होते. पुढील कारवाई सुरू आहे.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE